विशेष प्रतिनिधी
मुंबई : आता आमच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांनी आणि टीका करणाऱ्यांनी जरा इतिहास आठवावा. आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले पाहिजे’, असं स्पष्ट लिहून सर्व आमदारांनी सह्यांचे पत्र आदरणीय शरद पवार साहेबांना दिलं होतं. त्या पत्रावर सर्वात पहिली सही कुणी केली होती? तो कागद आता शोधून काढण्याची वेळ आली आहे, असा सुचक इशारा राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांना दिला आहे. Sunil Tatkare
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 27 व्या वर्धापनदिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात बाेलताना तटकरे म्हणाले, आज आमच्यावर गद्दारीची आणि भाजपसोबत गेल्याची महायुतीवरून टीका होत आहे. परंतु, 2019 साली अजित दादांच्या शासकीय कार्यालयात पक्षाचे सर्व आमदार एकत्र बसले होते. त्यावेळी ‘आपण भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले पाहिजे’, असं स्पष्ट लिहून सर्व आमदारांनी सह्यांचे पत्र आदरणीय शरद पवार साहेबांना दिलं होतं. आता आमच्यावर तोंडसुख घेणाऱ्यांनी आणि टीका करणाऱ्यांनी जरा इतिहास आठवावा. त्या पत्रावर सर्वात पहिली सही कुणी केली होती? तो कागद आता शोधून काढण्याची वेळ आली आहे. जर 2019 मध्ये दादांनी घेतलेला तो निर्णय कायम राहिला असता, तर महाराष्ट्राचे आजचे राजकारण पूर्णपणे वेगळे असते .
तटकरे म्हणाले की, “2004 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष बनला होता. काँग्रेस आणि आपण एकत्रित लढलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या विरोधात बोलण्याचे धारिष्ट्य कुणामध्येच नव्हते, मात्र अजित दादांनी संघर्ष करून काँग्रेसकडून जागा सोडवून घेतल्या होत्या.2004 मध्ये जर आपण मुख्यमंत्रिपद स्वतःकडे ठेवले असते तर आज राष्ट्रवादीचे पहिल्या क्रमांकाचे स्थान कुणीच हिरावून घेऊ शकले नसते.”
छगन भुजबळ यांच्या कथित नाराजीवर बाेलताना तटकरे म्हणाले, “छगन भुजबळ साहेब हे राजकारणातील कबड्डीचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. उत्तम कोपरारक्षक आणि मध्य रक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. खोलवर चढाई कशी करायची, हे भुजबळांशिवाय कुणालाच ठाऊक नाही. कधी बोनस गुण घेऊन येतील, कधी एकाच वेळी सातही जणांना घेऊन येतील. हा 80 वर्षांचा तरुण खेळाडू आता सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा मैदानात उतरला आहे. त्यांच्या शेजारी फुटबॉलपटू प्रफुल पटेल बसले आहेत, तर पलीकडे कुस्तीपटू हसन मुश्रीफ आहेत. ही सर्व तगडी टीम अजित दादांनी तयार केली असून, आम्ही हा संघ नक्की यशस्वी करू.”
Who First Signed to Join BJP? Sunil Tatkare Warns Rohit Pawar Against Digging Up Old Documents
महत्वाच्या बातम्या