Pune shaken पुणे हादरलं! युवकावर भरदिवसा गोळीबार; हल्ल्यानंतर ४ जण ताब्यात

विशेष प्रतिनिधी

पुणे :  Pune shaken सहकारनगर परिसरात भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने पुणे शहर पुन्हा हादरले. पोलिसांनी अवघ्या काही तासांत मोठी कारवाई करत चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. या थरारक हल्ल्यात योगेश बनेकर हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरात दोन गोळ्या लागल्याची माहिती समोर आली आहे.Pune shaken

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश बनेकर याच्यावर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. सलग गोळ्या झाडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली.Pune shaken



घटनेनंतर जखमी योगेश बनेकर याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार तपासाची चक्रे वेगाने फिरवली. या तपासादरम्यान आदित्य थोपटे, लखन वाघमारे, अनिकेत शिरसाठ आणि रोहित नाचरे या चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पर्वती पोलिसांकडून चौघांची कसून चौकशी सुरू असून हल्ल्यामागे जुने वाद, आर्थिक व्यवहार की टोळी संघर्ष, याचा शोध घेतला जात आहे. अद्याप गोळीबाराचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाढलेल्या गोळीबार आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सहकारनगरातील या धाडसी हल्ल्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Pune shaken: Youth shot at in broad daylight; four detained after attack

महत्वाच्या बातम्या