Pune water : पाणीकपातीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता, आज महापौर आणि प्रशासनाची तातडीची बैठक

विशेष प्रतिनिधी

पुणे : Pune water  खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचल्याने पुणेकरांवर दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट अधिक गडद झाले आहे. या संभाव्य पाणी संकटाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ८ ) महापौर आणि महापालिका प्रशासनाची महत्त्वाची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत शहरात दिवसाआड पाणीपुरवठा लागू करण्याच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष उद्याच्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे लागले आहे.Pune water

पाटबंधारे विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या खडकवासला धरण साखळीची एकूण क्षमता २९.१५ टीएमसी आहे. मात्र, सध्या धरणांमध्ये केवळ ५.८७५ टीएमसी (मंजूर कोट्याच्या तुलनेत केवळ २०.१५ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे शहराला दररोज सुमारे १,५०० एमएलडी (दशलक्ष लिटर) पाण्याची आवश्यकता भासते. हा उपलब्ध साठा ३१ जुलैपर्यंत म्हणजेच मान्सून स्थिरावत नाही तोपर्यंत पुरवणे प्रशासनासमोर मोठे आव्हान आहे.Pune water



हवामान विभागाने यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवला असून, मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणीपुरवठा विभागाने आधीच कपातीचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार शहरात क्षेत्रनिहाय रोटेशन पद्धतीने एवâ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांनी तयार केला आहे. या प्रस्तावामुळे शहरात सुमारे २५ टक्के पाणी बचत होऊ शकते, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

हा प्रस्ताव अतिरिक्त आयुक्तांमार्फत महापालिका प्रशासनाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. धरणसाठा झपाट्याने खाली जात असल्याने पाणीकपातीचा कटू निर्णय घेणे आता अपरिहार्य बनले आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत या कपातीवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे आहेत.

Pune water cuts likely to be finalized today; mayor, officials to hold emergency meeting

महत्वाच्या बातम्या