विशेष प्रतिनिधी
मुंबई : Dr. Madhavi Khode मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर राज्य सरकारने चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. या बदल्यांमध्ये अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी डॉ. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, सुनील महिंद्रकर यांची अतिरिक्त मुद्रांक नियंत्रकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.Dr. Madhavi Khode
महाराष्ट्र संवर्गातील २००७ बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या डॉ. माधवी खोडे-चावरे या सध्या नागपूर विभागाच्या अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. योगेश म्हसे-पाटील यांच्या सेवानिवृत्तीनंतर रिक्त झालेल्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.Dr. Madhavi Khode
डॉ. खोडे-चावरे यांनी नागपूर विद्यापीठातून एमबीबीएस तसेच मानसशास्त्र विषयात एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. प्रशासकीय सेवेत त्यांनी भंडारा जिल्हाधिकारी, नागपूर वस्त्रोद्योग संचालक आणि वनमतीच्या महासंचालक यांसारखी महत्त्वाची पदे भूषविली आहेत. मार्च २०२५ मध्ये त्यांच्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आला होता. आदिवासी आश्रमशाळांमधील बालहक्क जनजागृती मोहिमेसाठी त्यांना ईआयजी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
राज्यातील चार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या
१) डॉ. माधवी खोडे-चावरे (आयएएस, २००७ बॅच)
अतिरिक्त विभागीय आयुक्त, नागपूर विभाग येथून सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती.
२) सुनील महिंद्रकर (आयएएस, २०१५ बॅच)
अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर नियुक्ती.
३) अनिता मेश्राम (आयएएस, २०१५ बॅच)
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अकोला येथून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूरच्या आयुक्तपदी नियुक्ती.
४) आदित्य जीवने (आयएएस, २०२१ बॅच)
महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक, छत्रपती संभाजीनगर येथून जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती.
राज्य शासनाच्या या प्रशासकीय फेरबदलामुळे विविध विभागांना नवे नेतृत्व मिळणार असून, प्रशासनातील कार्यक्षमता आणि निर्णयप्रक्रियेला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Four IAS officers transferred; Dr. Madhavi Khode-Chavare appointed Secretary of Minority Development Department
महत्वाच्या बातम्या