आंदोलन मागे घेण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, मनाेज जरांगे यांनी केले स्पष्ट

विशेष प्रतिनिधी

जालना : सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होणार असली तरी आंदोलन मागे घेण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही. सरकारची भूमिका काय आहे, ते आधी कळू द्या. मात्रल इतिहासात आजपर्यंत झालं नाही असं, उपोषण 30 तारखेपासून सुरू करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, उपोषणामुळे माझे प्रचंड हाल होतात, पोटात आग होते, तरीही समाजाच्या लेकरांसाठी मी उन्हात स्वतःला झिजवत आहे. मराठा समाजाच्या मुलांवर अन्याय होत आहे. आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या, पण गोरगरीब मराठ्यांचं आयुष्य का उद्ध्वस्त करताय? सरकार केवळ राजकारण, निवडणुका आणि पक्षफोडीत व्यस्त आहे.

सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा होणार असली तरी आंदोलन मागे घेण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नसल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं. सरकारची भूमिका काय आहे, ते आधी कळू द्या. विखे पाटील आणि इतर मंत्री काय अंमलबजावणी घेऊन येत आहेत, हे मी पाहणार आहे. पण 30 मेचं उपोषण निश्चित आहे. हे आंदोलन इतकं कठोर असेल की देशाने यापूर्वी असं काही पाहिलेलं नसेल. आश्वासनांवर समाजाचं पोट भरत नाही ठोस निर्णय व्हायला हवेत.



उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सराकर सकारात्मक असल्याच्या वक्त्वयाचा समाचार घेताना जरांगे म्हणाले, 10 महिन्यांत मराठा समाजाचं वाटोळं झालं, त्यालाच सरकार सकारात्मक म्हणत असेल तर ते खरंच आहे. सारथीच्या योजना बंद झाल्या, आंदोलनातील गुन्हे मागे घेतले नाहीत, बलिदान दिलेल्या कुटुंबांना नोकऱ्या किंवा निधी मिळाला नाही. 58 लाख कुणबी नोंदी सापडल्याचं सांगितलं, पण व्हॅलिडिटी दिली नाही.

जरांगे यांनी सरकारसमोर 10 प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. मराठवाड्यातील मराठा समाजाला तातडीने कुणबी प्रमाणपत्र देणे, सातारा-कोल्हापूर-औंध-पुणे-मिरज संस्थानांसाठी 1994 च्या धर्तीवर शासन निर्णय काढणे, आंदोलनातील सर्व गुन्हे मागे घेणे, आंदोलनातील मृतांच्या कुटुंबीयांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरी देणे, सारथीच्या योजना पुन्हा सुरू करणे, महामंडळाचे परतावे वाटप करणे, कुणबी प्रमाणपत्रांना वैधता देणे, मराठा उपसमिती बरखास्त करणे, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करणे आणि शिंदे समितीला मुदतवाढ देऊन नोंदींची तपासणी सुरू ठेवणे अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत.

No decision has been taken yet to withdraw the protest, Manoj Jarange clarified.

महत्वाच्या बातम्या