नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी तेजस शहा नेमका कोण?

विशेष प्रतिनिधी

पुणे: देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून पुण्यातील फिजिक्स शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. पुण्यातील डॉक्टर ‘अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी’ मध्ये फिजिक्स विषय शिकवणाऱ्या तेजस हर्षदकुमार शहा हा पेपरफुटी प्रकरणात महत्वाचा दुआ असण्याचा संशय सीबीआयकडून व्यक्त करण्यात आला आहे.

तेजस शहा नेमका कोण?

तेजस शहा हा पुण्यातील ‘ डॉ.अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी ‘ येथे फिजिक्स विषयाचा शिक्षक होता.या प्रमाणात अगोदरच सीबीआयच्या ताब्यात असलेल्या मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईल मध्ये तेजस शहाचा मोबाईल नंबर ‘ गॉड ‘ नावाने सेव्ह होता.नीट परीक्षेतील फिजिक्स विषयाची परीक्षा होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका आणििकांकडे उपलब्ध होती. या प्रश्नांची देवाण-घेवाण, उत्तर पत्रिका तयार करणे आणि संबंधित उमेदवारांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मोठे जाळे तयार करण्यात आले होते.


मराठा युवकांसाठी देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी


पेपरफुटी प्रकरणात तेजस शहाचा रोल काय?

तपास यंत्रणांकडून सांगितल्याप्रमाणे, मनिषा हवालदार हिने लीक झालेले फिजिक्स विषयाचे प्रश्न हस्तलिखित स्वरूपात तेजस शहाला दिले होते.त्यानंतर हे प्रश्न पुढे पाठवण्यासाठी तेजस शहाने डिजिटल माध्यमांचा वापर केल्याचा आरोप आहे. सीबीआयला मिळालेल्या पुराव्यानुसार, फिजिक्सचे प्रश्न मनिषा हवालदारच्या पतीच्या व्हाट्सअपवर पाठवले होते. यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी संबंधित चॅट्स कागदपत्रे आणि डिजिटल माहिती डिलीट करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप देखील तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे.

सीबीआयने तेजस शहाला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याची सीबीआय कोठडी मिळवण्यात आली आहे. चौकशी दरम्यान इतर आरोपींशी असलेले संबंध, आर्थिक व्यवहार, मोबाईल आणि डिजिटल व्यवहार, तसेच पेपरफुटी बद्दल कोणत्या प्रकारच्या आर्थिक लाभ झाले का याची चौकशी सध्या सुरू आहे.

Who exactly is Tejas Shah, the accused in the NEET paper leak case?

महत्वाच्या बातम्या