Mumbai Police : चैत्यभूमीवरील सीजेपी आंदोलन आयोजकांविरोधात मुंबई पोलिसांचे तीन गुन्हे दाखल

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai Police दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ कॉकरोच जनता पार्टी तर्फे दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीवर सुरू करण्यात आलेले आंदोलन सोमवारी सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. आंदोलनासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असतानाही मोठ्या संख्येने विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.Mumbai Police

आंदोलनाची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. आंदोलकांना वारंवार परिसर रिकामा करण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र अनेकांनी आंदोलन सुरूच ठेवल्याने पोलिसांनी काही ठिकाणी हस्तक्षेप करत अनेक विद्यार्थी, महिला आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. आपल्या लहान मुलासह आंदोलनस्थळी आलेल्या एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना चर्चेचा विषय ठरली.Mumbai Police



दरम्यान, रविवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या आंदोलनाप्रकरणी मुंबई पोलिसांनी आयोजकांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आंदोलनासाठी कोणतीही अधिकृत परवानगी देण्यात आली नव्हती. परवानगी नाकारल्यानंतरही सभा घेण्यात आली आणि नागरिकांना आंदोलनासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये विनापरवानगी सभा आणि आंदोलन आयोजित करणे, परवानगी नसतानाही विद्यार्थी व नागरिकांना आंदोलनासाठी एकत्र येण्यास प्रवृत्त करणे तसेच सभा संपल्यानंतरही आंदोलकांनी दादर परिसरात ठिय्या आंदोलन करून वाहतुकीत अडथळा निर्माण केल्याचा समावेश आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसून तपास सुरू आहे.

Mumbai Police File Three Cases Against CJP Protest Organisers

महत्वाच्या बातम्या