विशेष प्रतिनिधी
मुंबई : Laxman Hake ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ‘ओबीसी जनता पार्टी’ या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाला सक्षम राजकीय प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी नव्या पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले.Laxman Hake
यावेळी बोलताना हाके यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “भाजपचा डीएनए आता ओबीसी राहिलेला नसून कारखानदारांचा झाला आहे,” असा आरोप त्यांनी केला. सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदे यांची गरज होती, मात्र त्यानंतर अजित पवार यांच्या गटाला सोबत घेण्याची आवश्यकता काय होती, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.Laxman Hake
भाजपने पक्षफोडीचे राजकारण थांबवावे, असे आवाहन करत हाके म्हणाले की, सत्तेत येऊन बराच काळ झाला असून आता सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पांडुरंगाच्या महापूजेला गेल्यानंतर त्यांना पक्षफोडी थांबवण्याची सद्बुद्धी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हाके यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचाही उल्लेख केला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून निवडून आलेले काही खासदार पुन्हा शिंदे गटाकडे गेल्याचा दाखला देत त्यांनी भाजपच्या राजकीय भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करताना हाके म्हणाले की, ओबीसी समाजाच्या शोषणाविरोधात राष्ट्रवादीने कोणता लढा उभारला, याचे उत्तर द्यावे. राष्ट्रवादी नेहमीच सत्तेच्या जवळ राहिली असून कारखाने, उद्योगपती आणि सत्ताधाऱ्यांशी संबंध निर्माण केले, असा आरोप त्यांनी केला.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगळे असल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात त्यांच्यात फारसा फरक नसल्याचा दावा हाके यांनी केला. निवडणुका स्वतंत्रपणे लढवल्या तरी हे केवळ जनतेसमोर वेगळेपणा दाखवण्यासाठी असल्याचे त्यांनी म्हटले.
Laxman Hake announces OBC Janata Party
महत्वाच्या बातम्या
- Dr Kumar Saptarshi : ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. कुमार सप्तर्षी यांचे निधन
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी जाहिरात, होर्डिंग, उत्सव नको! पक्षातर्फे आवाहन
- पुण्याची वाहतूककोंडी फोडणार तीन महामार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
- आपलं म्हणणं खरं करणं यालाच हुकूमशाही म्हणतात, उद्धव ठाकरे यांची टीका