‘उद्या कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करु’, कृषीमंत्री भरणेंची घोषणा !

विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र :- शेतकरी कर्जमाफीची अंमलबजावणी कधी होणार असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. आता 30 जुलैच्या आत कर्जमाफी loan waivers मिळेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी माहिती आपल्या सहकाऱ्यांना दिली होती, अशी सूत्रांची माहिती आहे.

सोबतच, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून देखील 30 जुलैआधीच सरकारकडून शेतकरी कर्जमाफी करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. केंद्राकडून शेतकऱ्यांच्या आयकर परताव्याचा डेटा अंतिम झाल्याची माहिती आहे. अशातच, राज्य सरकारकडून यासंदर्भात लवकरच कार्यवाही करत कर्जमाफीसंदर्भात येत्या काही दिवसांत अंमलबजावणीला सुरुवात होताना दिसणार आहे.



शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत बोलताना कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, ‘उद्याच आम्ही कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करू. अजित पवार यांची जयंती आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे म्हणून उद्याच जाहीर करण्याचा प्रयत्न आहे. आयकर बाबतचा डेटा देखील परवा प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोणतीच अडचण नाही. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जाणार, बोगस बियाणं प्रकरणात कारवाईचा धडाका सुरू आहे. तसेच 11 हजार 584 तक्रारी प्राप्त असून 81 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे’.

“We will announce the preliminary list of loan waivers tomorrow,” announces Agriculture Minister Bharne!

महत्वाच्या बातम्या