विशेष प्रतिनिधी
पुणे: स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषदेच्या पुण्याचा जागेवरून भाजपा आणि राष्ट्रवादीत दुमत असेल तरी, राष्ट्रवादी कडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे.पुण्याचा विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवाराची निवड खासदार पार्थ पवार करणार आहेत.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी पार्थ पवारांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती हॉस्टेल येथे पुण्यातील माजी आमदारांशी संवाद साधला.तसेच इच्छुक उमेदवारांशी देखील संवाद साधला.सध्या पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी घेतल्यानंतर खासदार पार्थ पवार हे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेत आहेत.त्यामुळे पुण्यातील उमेदवार निवडीचा निर्णय पार्थ पवार घेणार असल्याचे राष्ट्रवादीतील ज्येष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीकडून कोण कोण इच्छुक?
पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका तसेच जिल्ह्याचा ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी माजी आमदार इच्छुक आहेत.पुण्यातील माजी आमदार सुनील टिंगरे, पिंपरी चिंचवड मधील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे हे इच्छुक आहेत.तर, ग्रामीण भागातून माजी आमदार रमेश थोरात आणि दिलीप मोहिते हे इच्छुक आहेत.
Movements in NCP regarding Pune Legislative Council; Will Parth Pawar decide the candidate?
महत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश