विशेष प्रतिनिधी
पुणे:राज्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून त्यापैकी १६ जागांसाठी नियमित निवडणूक, तर एका ठिकाणी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असून २२ जून रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच प्रमुख पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
या १६ जागांपैकी दोन जागांवर निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इच्छूक असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रायगड-रत्नागिरी आणि पुणे या महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांचा समावेश आहे. विशेषतः पुणे विधानपरिषद मतदारसंघावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी स्पर्धा निर्माण झाली असून इच्छुक नेत्यांनी आतापासूनच लॉबिंग सुरू केले आहे.
राष्ट्रवादीकडून कुणाला मिळणार संधी?
पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक पदाधिकारी,माजी आमदार इच्छुक असल्याने पक्ष नेतृत्वापुढे उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या जागेसाठी माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे आणि नाना काटे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.
पुण्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी रस्सीखेच..
आकडेवारीनुसार पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे ३४४ प्रतिनिधी आहेत, तर भाजपकडे ३०६ प्रतिनिधींचे संख्याबळ आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ६८ सदस्य, काँग्रेसकडे १९, शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे १७ आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे ११ सदस्य आहेत.
या संख्याबळामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्याची जागा आपल्याकडे ठेवण्याचा जोरदार दावा केला आहे. मात्र, पुण्यात भाजपचेही मजबूत संघटन आणि स्थानिक पातळीवरील प्रभाव लक्षात घेता भाजप या जागेवर किती आक्रमक भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Crowd of aspirants in NCP for Pune Legislative Council; Possibility of a tug of war over seat sharing in the Grand Alliance
महत्वाच्या बातम्या
- सोलापूर स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपचं पारडं जड; कुणाला मिळणार संधी?
- महाराष्ट्रात ‘कर्करोग ग्रीड’ तयार करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
- नीट-यूजी २०२६’ पेपरफुटी प्रकरणावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
- पुण्यात कॅन्सर रुग्णालयाच्या उद्घाटनाआधीच वाद; श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव दिल्याने चर्चा