विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरात पुणे महानगरपिका आणि आपुलकी मेडिकल केअर सेंटर च्या माध्यमातून बाणेर येथे कॅन्सर आणि हृदयरोग रुग्णालय उभारण्यात आले आहे.मात्र या रुग्णालयाला स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव देण्यात आल्याने भाजपात वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.रुग्णालयाला नाव देताना कोणत्याही नगरसेवकाला विश्वास घेण्यात न आल्याने भाजपात मिठाचा खडा पडण्याची शकत्या वर्तवली जात आहे.
शहरात मागील अनेक वर्षापासून कॅन्सर रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन पुणे महापालिका आणि आपुलकी मेडिकल केअर सेंटरच्या माध्यमातून सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले आहे.तब्बल १५० खाट असलेले हे रुग्णालय आहे.१७ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.या रुग्णालयाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी महापालिकेने मोठे तयारी केली आहे.
उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला अचानक देण्यात आले नाव?
र पुणे महापालिका आणि आपुलकी हेल्थ केअर सेंटर च्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या या रुग्णालयाला ‘ यशवंतराव भिमाले ‘ रुग्णालय असे नाव देण्यात आले आहे.मात्र, रुग्णालयाचे उद्घाटन झाल्यानंतर या रुग्णालयाला ‘ यशवंतराव भिमाले ‘ असे नाव देण्यात येणार असल्याची सर्वत्र चर्चा होत.शुक्रवारी रुग्णालयाच्या पाहणी दरम्यान फलकावर पुणे महापालिका आणि आपुलकी मेडिकल हेल्थ केअर सेंटर नाव देण्यात आल्याचे निदर्शनास आले होते.मात्र शनिवारी ‘ यशवंतराव भिमाले ‘ असे नाव आल्याचे निदर्शनास आले.
‘ यशवंतराव भिमाले ‘ नाव देण्याचे कारण काय?
शहरातील सॅलिसबरी पार्क येथे असलेल्या उद्यानाला श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांचे नाव देण्यात आलेले आहे.श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले की, ‘ हे रुग्णालय अगोदर सॅलिसबरी पार्क येथे होणार होते. त्यावेळी या रुग्णालयाला माझ्या वडिलांचे नाव देण्यात यावे,असा ठराव मी चार वर्षांपूर्वीच नाव समितीमध्ये करून घेतला होता.पण हे रुग्णालय आता बाणेर येथे उभारण्यात आल्याने त्यास ‘ यशवंतराव भिमाले ‘ असे नाव देण्यात आले आहे ‘.
Controversy even before the inauguration of a cancer hospital in Pune; Discussion over naming it after Srinath Bhimale’s father
महत्वाच्या बातम्या