राष्ट्रवादी अजित पवार गटाला धक्का! आनंद परांजपे यांचा सर्व पदांचा राजीनामा

विशेष प्रतिनिधी

 

पुणे: राष्ट्रवादी अजित पवार गटाला अजून एक मोठा धक्का बसला आहे,नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संधी न मिळाल्यामुळे माजी खासदार आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे.ट्विट करून आनंद परांजपे यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.

आनंद परांजपे यांनी ट्विट मध्ये नमूद केले आहे की, ‘ मनात अनेक भावना दाटून आलेल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात माझा १४ वर्षाचा प्रवास, सर्व नेते,पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मिळालेले प्रेम आणि विश्वास शेवटपर्यंत कायम माझ्या स्मरणात राहील. आज अत्यंत जड अंतःकरणाने हा प्रवास इथेच संपवून नव्या वाटेवर पाऊल टाकून नवीन प्रवासाची सुरुवात करत आहे! अशा भावना आनंद परांजपे यांनी व्यक्त केल्या आहेत.



माजी खासदार आणि प्रवक्ते आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला.प्राथमिक सदस्याचा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठवून दिला आहे.

आनंद परांजपे कोणत्या पक्षात प्रवेश करणार ?

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानपरिषद न मिळाल्यामुळे आनंद परांजपे नाराज होते अस सांगण्यात येत होत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही दिवसांपूर्वी त्यांनी आनंदवन येथे भेट घेतली होती. अनंत परांजपे शिंदे गटात प्रवेश करणार म्हणून अशा चर्चा रंगल्या होत्या.

Shock to NCP Ajit Pawar group! Anand Paranjape resigns from all posts

महत्वाच्या बातम्या