विशेष प्रतिनिधी
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात पुन्हा एकदा अंतर्गत राजकारण तापल्याची चर्चा सुरू झाली आहे.राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार इद्रिस नायकवडी यांच्या राजीनाम्याबाबत पक्षात मोठ्या हालचाली सुरू आहेत, मात्र या घडामोडींमुळे पक्षातील नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे.महत्वाचे म्हणजे, खासदार पार्थ पवार यांच्या स्तरावरून नायकवडी यांच्याकडे राजीनाम्याची मागणी करण्यात आल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पार्थ पवारांचे मित्रप्रेम..
विधानपरिषदेत नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा नावाखाली इद्रिस नायकवडी यांच्यावर दबाव वाढवला जात आहे.नायकवडी यांच्या जागेवर पार्थ पवारांचे जवळचे मित्र असलेले विक्रम काकडे यांना विधानपरिषदेत पाठवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.नुकत्याच विधानपरिषद निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विक्रम काकडे यांच्या नावाची चर्चा ऐकायला मिळाली होती.
पक्षांतर्गत नाराजी वाढली..
विक्रम काकडे यांच्या नावाची अचानक सुरू झालेली दबकी चर्चा अनेकांना धक्का देणारी ठरत आहे.पक्षातील जुन्या इच्छुकांना डावलून थेट जवळच्या व्यक्तीला संधी दिली जात असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर वेगवेगळे गट सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.त्यातच आता विधानपरिषद नियुक्तीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन संघर्ष उभा राहताना दिसत आहे.
विक्रम काकडे कोण आहेत?
विक्रम काकडे हे भाजपाचे माजी खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव आहेत.ते पुण्यातील प्रतिष्ठित व्यावसायिक म्हणून देखील ओळखले जातात.तसेच विक्रम काकडे हे खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय आणि जवळचे मित्र देखील आहेत.आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. पक्षातील युवा नेतृत्वाला संधी देण्याच्या भूमिकेतून पार्थ पवार पूर्ण ताकदीने विक्रम काकडे यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Parth Pawar’s ‘friendship’ causes discord within the NCP; Pressure on Nayakwadi for Vikram Kakde?
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात ४०० कोटींच्या गुंतवणुकीसह पुढील १० वर्षात एक हजार रोजगार निर्मिती होणार, मुख्यमंत्र्यांचा विश्वास
- इद्रिस नायकवडींच्या राजीनाम्याच्या चर्चांना उधाण; आमदार म्हणाले- “ही केवळ वावडी”
- कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक
- गोकुळ दूधसंघासाठी तीन महिन्यांत निवडणूक? सहकार विभागाचे महत्वाचे आदेश जारी