विशेष प्रतिनिधी
पुणे: आध्यात्मिक उपचारांच्या बहाण्याने कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या भोंदू अशोक एकनाथ खरात ऊर्फ ‘कॅप्टन’ याला अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मुंबईतून अटक केली आहे. ईडीच्या मुंबई आंचलिक कार्यालयाने मनी लॉन्ड्रिंग आणि कथित खंडणी प्रकरणाच्या चौकशीनंतर ही मोठी कारवाई केली. Ashok Kharat
खरातला १९ मे २०२६ रोजी धन शोधन निवारण कायद्यांतर्गत अटक करण्यात आली असून, मुंबईच्या विशेष न्यायालयाने त्याला २६ मे २०२६ पर्यंत ७ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. ही माहिती ईडीने आज त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून दिली आहे.
ईडीने दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी अशोक खरात हा केवळ धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात गुंतलेला नव्हता, तर या पवित्र क्षेत्राच्या आडून तो एक अत्यंत पद्धतशीर आणि संघटित खंडणीचे रॅकेट चालवत होता. भोळ्याभाबड्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्या मनात विविध भीती निर्माण करून तो त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत असल्याचे तपासात उघड झाले आहे. या अवैध आर्थिक व्यवहारांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी ईडीने मागच्या एका महिन्यात आक्रमक पावले उचलली आहेत.
या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने १३ आणि १४ एप्रिल, १७ एप्रिल, २३ एप्रिल, ५ मे आणि १८ मे २०२६ रोजी आरोपी अशोक खरात आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या वेगवेगळ्या ठिकाणांवर एकापाठोपाठ एक धाडी टाकल्या. या प्रदीर्घ शोध मोहिमेमध्ये ईडीच्या हाती मोठे घबाड आणि महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. छाप्यात तब्बल १३.९२ कोटी रुपयांची थेट रोकड आणि ५,५०० अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत.
सुमारे १.१२ कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, विविध बँकांमधील २.२५ कोटी रुपयांची रोकड फ्रीज (गोठवण्यात) करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पैशातून खरेदी केलेली एक अत्यंत महागडी ‘मर्सिडीज बेंज’ कार जप्त करण्यात आली असून अनेक बेनामी मालमत्तांचे रेकॉर्ड आणि डिजिटल उपकरणे ईडीने ताब्यात घेतली आहेत.
ED arrests fraudster Ashok Kharat in multi-crore scam
हत्वाच्या बातम्या
- High Court : जनावरांच्या कत्तल निर्बंधांवर स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा नकार
- Rohit Pawar : “भाजपसोबत जाणार नाही”; रोहित पवारांच्या विधानाने राष्ट्रवादीत नव्या चर्चांना उधाण
- ‘नीट’चा पेपर कसा फोडला, ते ही पुरावा न सोडता; चौकशीसाठी पोलिसांनी गाठलं मांढरेंचं कॉलेज! तपासात काय सापडलं पाहा!
- शेतकऱ्यांना कर्जवाटप वाढवा, सीबीलमुळे कुणालाही रोखू नका; मुख्यमंत्री फडणवीसांचे बँकांना निर्देश