गोकुळ दूधसंघासाठी तीन महिन्यांत निवडणूक? सहकार विभागाचे महत्वाचे आदेश जारी

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: मागील अनेक दिवसांपासून गोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीवरून वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे,आता पुन्हा एकदा गोकुळच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे.सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू करण्यात आली आहे.२ जून ते १ जुलै २०२६ या कालावधीत ठराव दखल करण्याची मुदत दुग्ध निबंधक यांच्याकडून देण्यात आली आहे.

गोकुळ दूध संघातील अवसयानातील १३०८ दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया पार पडल्यानंतरच निवडणुका घेण्याचे आदेश कोल्हापूर सर्किट बँकेने दिले होते.संबंधित चौकशी ८० दिवसात पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.आता जवळपास ८०० ते ९०० दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानेही ९० दिवसात निवडणूक घ्या असे निर्देश दिले.



तीन महिन्यात निवडणुकीची शक्यता..

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील यांनी गोकुळ दूध संघाला महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.या आदेशामुळे आता पुढील तीन महिन्यात गोकुळची निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.२६ मे ते १ जूनपर्यंत गोकुळ दूधसंघशी संलग्न असणाऱ्या प्राथमिक दूध संस्थांनी मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी पत्र पाठवण्याचे निर्देश देखील दिल्यात आलेले आहे.

गोकुळ दूध संघाची निवडण येत्या ३ महिन्यात लागण्याची शक्यता आहे.संस्थेने प्रतिनिधी ठराव पाठवल्यानंतर दुग्ध निबंधक कार्यालकडून प्रारूप यादी जाहीर केली जाणार आहे.त्यानंतर प्रारूप यादीवर हरकती आणि अंतिम यादी जाहीर केली जाईल.

Elections for Gokul dudh Sangh in three months? Important orders issued by the Cooperation Department

महत्वाच्या बातम्या