विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : Rohit Pawar महायुती सरकारने जाहीर केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीतील जाचक अटी आणि शर्तींमुळे बहुतांश शेतकरी या योजनेपासून वंचित राहतील, असा आरोप करत आंदोलन सुरू केले आहे. Rohit Pawar
दरम्यान, आंदाेलनस्थळी लावलेल्या पडद्यावरून राेहित पवारांनी प्रशासनावर टीका केली आहे. पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या आजूबाजूने पडदा लावून हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचू नये, असा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. खरं म्हणजे पडदा लावायला इथं काही तमाशा सुरु नाही.. उलट सरकारच्या धोरणांमुळं सामान्य माणूस आणि शेतकऱ्याच्याच संसाराचा तमाशा झालाय, मात्र सरकारला याचं काहीही घेणंदेणं नाही, हे दुर्दैव आहे! असे त्यांनी म्हटले आहे. Rohit Pawar
पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलनाच्या आजूबाजूने पडदा लावून हे आंदोलन जनतेपर्यंत पोहोचू नये, असा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. खरं म्हणजे पडदा लावायला इथं काही तमाशा सुरु नाही.. उलट सरकारच्या धोरणांमुळं सामान्य माणूस आणि शेतकऱ्याच्याच संसाराचा तमाशा झालाय, मात्र सरकारला याचं काहीही… pic.twitter.com/toazPuwbUE
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 12, 2026
आमदार रोहित पवार आज सकाळी ९ वाजल्यापासून पंढरपूरमध्ये आंदोलन सुरू केले आहेत. विठ्ठल भक्तांना आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजी घेत रोहित पवार नामदेव पायरीवरून बाहेरूनच विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत.
रोहित पवारांनी ट्विट करत म्हटले की, “विठुरायाची पंढरी सर्व भक्तांसाठी कायम खुली असतानाही सरकार बॅरिकेड्स लावून आमच्या मार्गात अडथळे आणत आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाने प्रत्येकाला आंदोलनाचा अधिकार दिलाय. त्यामुळे अन्नदात्यासाठीच्या या अन्नत्याग आंदोलनात कितीही अडथळे आणले तरी हे आंदोलन थांबणार नाही.” सरकारच्या हुकूमशाही वृत्तीवर तोफ डागत ते पुढे म्हणाले, “सत्तेचा अहंकार जनतेच्या ताकदीसमोर कधीही टिकत नसतो. लढणाऱ्यांचे हात धरून आणि बोलणाऱ्यांचे तोंड दाबून सरकार स्वतःचाच पराभव सिद्ध करतंय. सरकारच्या दबावामुळे जिल्हा आणि स्थानिक प्रशासनाकडून अडथळे आणले जात असले, तरी मनाने मात्र प्रशासनातील सर्वजण आमच्यासोबत आहेत, हे सरकारने विसरू नये.
राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांसाठी ३५ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केलीय. परंतु त्यासोबत जोडलेल्या अनेक अटी व शर्तींमुळे राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कालच (११ जून) मंचर येथे विविध शेतकरी संघटनांनी एकत्र येत सरकारच्या या कर्जमाफीच्या जीआरची होळी केली होती.
Rohit Pawar’s food boycott movement in Pandharpur against the oppressive conditions of loan waiver
महत्वाच्या बातम्या