काॅंग्रेसकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरणाचा प्रस्ताव

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाकडून सुरू असलेल्या फाेडाफाेडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाची ऑफर दिल्याचं समोर आले आहे.देशाच्या राजकारणात विरोधी पक्षांमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीत काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला आहे. अद्याप शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या प्रस्तावावर भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही.

जर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचे विलीनीकरण काँग्रेसमध्ये झाले तर लोकसभेत काँग्रेस खासदारांची संख्या ८ ने वाढेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवला होता. इंडिया आघाडीतून त्यांनी निवडणूक लढवली होती. या पक्षाचे प्रमुख शरद पवार सध्या राज्यसभेत खासदार आहेत. सुप्रिया सुळे, निलेश लंके, अमोल कोल्हे, अमर काळे यांच्यासह ८ लोकसभेचे खासदार आहेत.



राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस विचारधारेच्या पक्षांनी विलीनीकरणाचा विचार केला पाहिजे असं मत खासदार संजय राऊत यांनी मांडले होते. काँग्रेसपासून वेगळे होऊन ज्या लोकांनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता त्यांनी पुन्हा एकत्र यायला हवे. अनेक असे नेते आहेत जे काँग्रेस आणि काँग्रेस नेतृत्वातील सरकारचा भाग राहिलेले आहे. ते त्याच विचारधारेचे आहेत.

जर काँग्रेस विचारधारेचे लोक एकवटले तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एक मोठं आव्हान उभे करता येऊ शकते. शरद पवारांनी या दिशेने पुढाकार घ्यायला हवा. तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादीसारख्या पक्षांनी ज्यांच्या नेत्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून पक्ष बनवला होता. त्यांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले पाहिजे असं संजय राऊत यांनी म्हटलं होते

संजय राऊत नेहमी देशहिताच्या दृष्टीने त्यांचे मत मांडत असतात. प्रत्येकाला आपली मते मांडण्याचा अधिकार आहे. संजय राऊत यांनी दिलेल्या सल्ल्याची निश्चित नोंद घेऊ असे राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या हाेत्या.

Congress proposes merger with Sharad Pawar’s NCP

महत्वाच्या बातम्या