जुन्या वाहनांना इंधन विक्रीबंदीला तात्पुरती स्थगिती; दिल्ली सरकारचा मोठा निर्णय
दिल्ली सरकारने जुन्या वाहनांवर इंधन विक्री बंदीचा निर्णय दोन दिवसांनंतरच तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. १० वर्षांहून अधिक जुन्या डिझेल वाहनांना आणि १५ वर्षांहून अधिक जुन्या पेट्रोल वाहनांना इंधन विक्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती.











