Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Pahalgam Attack
मुंबई

Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्यात मृत्यू झालेल्या सहा नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाखांची आर्थिक मदत वितरित करण्यात आल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी दिली.

ravi rana
महाराष्ट्र

Ravi Rana : अजितदादांचे 50 फोन अन्यथा खोडकेंना 10 हजारांनी पाडलं असतं, रवी राणा यांचा हल्लाबोल

महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अमरावतीत आमदार रवी राणा विरुद्ध संजय खोडके वाद उफाळला आहे. खोडकेंनी एवढी गुर्मी व दादागिरी करू नये असा इशारा रवी राणा (Ravi Rana) यांनी दिला आहे.

Mumbai-Pune Expressway
मुंबई

Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक सुरु होण्यास उजाडणार डिसेंबर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकच्या कामातील सर्वात अवघड असलेले व्हर्टिकल ब्रिजचे काम सध्या सुरू आहे. हे काम अत्यंत अवघड असून येत्या डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होणार असून त्यानंतर तो प्रवाशांसाठी खुला होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

ajit pawar
देश-विदेश

Ajit Pawar : अजित पवार गटाला मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार फुटून सत्ताधारी आघाडीत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नागालँडमध्ये मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे सात आमदार थेट मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) मध्ये विलीन झाले आहेत.

Chief Minister's Office
मुंबई

Chief Minister’s Office : मंत्र्यांचे पीएस, ओएसडी मुख्यमंत्री कार्यालयाच्या रडारवर, चूक आढळल्यास त्वरित समाज

मंत्रालयातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महायुती सरकारमधील तिन्ही पक्षांच्या मंत्र्यांचे पीएस, ओएसडी नेमण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने केले आहे. या पीएस, ओएसडींच्या कामगिरीवर लक्ष ठेवला जात असून एखाद्याने चूक केली तर त्याला बोलावून समजही दिली जात आहे.

Asaduddin Owaisi
देश-विदेश

Asaduddin Owaisi : तुरुंगात असताना दहशतवादी बनला बाप, पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर असदुद्दीन ओवैसी यांचा घणाघात

एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघात केला आहे.झकी-उर-रहमान लखवी या लष्कर-ए-तोयबाच्या कुख्यात अतिरेक्याचे उदाहरण देत पाकिस्तानवर गंभीर आरोप केले. पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय आणि विशेष वागणूक कशी देतो याचा पर्दाफाश त्यांनी केला.

aditya thackeray
मुंबई

Aditya Thackeray : एमएमआरडीएच्या १४ हजार कोटींच्या निविदा घोटाळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार, राजीनामा घेण्याची आदित्य ठाकरे यांची मागणी

एमएमआरडीएच्या ठाणे-घोडबंदर ते भाईंदर बोगदा व उन्नत मार्ग या प्रकल्पातील १४ हजार कोटींच्या निविदा घोटाळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांचा राजीनामा घेण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Pakistani troll
देश-विदेश

Pakistani troll : पाकिस्तानी ट्रोलला प्रत्युत्तर दिल्याबद्दल हिंदू विद्यार्थिनीला अटक: कोलकाता पोलिसांच्या हिंदू विरोधी भूमिकेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब

तब्बल १५०० किमीचा प्रवास करून कोलकाता पोलिसांनी गुरुग्राम येथून २२ वर्षांची कायद्याची विद्यार्थिनी शर्मिष्ठा हिला अटक केली. पाकिस्तानविरोधातील तिच्या व्हिडिओवरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत तिला अटक करण्यात आली. ही घटना सोशल मीडियावरून सुरू झालेल्या ‘सर तन से जुदा’ प्रकारातील धमक्यांनंतर घडली असून, शर्मिष्ठाने माफी मागून व्हिडिओदेखील हटवला होता.

Speeding car
पुणे

Speeding car : भरधाव मोटारीने एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना उडविले, उपचाराचा खर्च करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडविले. हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. त्यांच्या उपचाराचा खर्च करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

मुंबई

Aditya Thackeray दोन्ही ठाकरे एकत्र येऊ नये यासाठी आदित्य ठाकरे गट प्रयत्नशील, नितेश राणे यांचा दावा

दोन्ही ठाकरे एकत्र न येण्यासाठी आदित्य ठाकरेंचा एक गट प्रयत्नशील आहे, याची माहिती संजय राऊत का देत नाही? असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.

देश-विदेश

Kumar Vishwas पाकिस्तानला महिलांची ताकद दाखवून दिली, राष्ट्रीय महिला आयोगाच्या सोहळ्यात कुमार विश्वास यांचे प्रतिपादन

पाकिस्तानने ज्या महिलांचा अपमान केला त्या महिलांना पुढे आणून, आम्ही आमची ताकद दाखवून दिली आहे की आमच्या देशातील महिला कोणापेक्षाही कमी नाहीत, असे मत प्रसिद्ध कवी डॉ. कुमार विश्वास यांनी व्यक्त केले.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार माळेगावच्या रिंगणात, बिनविरोध निवड होऊ देणार असल्याचा विरोधकांचा इशारा

माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांची निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला आहे.