Raju Shetti: मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून राजू शेट्टी आक्रमक
‘महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’
‘महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा मंत्रिमंडळातील मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही’
हा करार “डिजिटल भारत, आत्मनिर्भर महाराष्ट्र” संकल्पनेला बळकटी देईल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काँग्रेस सरकार असताना महाराष्ट्रात पोलिसांचा धाक होता, मुंबई पोलिसांची तर स्कॉटलंड यार्डशी तुलना केली जात असे पण देवेंद्र फडणवीसांकडे गृहखात्याचा कारभार गेल्यापासून राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या विडंबन काव्याने सरकार बिथरले असून आता कामराचा कार्यक्रम पाहिलेल्या प्रेक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे समजते. प्रेक्षकांना नोटीस पाठवणे हा राज्यात पोलीस स्टेट आणण्याचा प्रयत्न आहे असे स्पष्ट दिसते, असा हल्लाबोल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
मुंबईतील खार पोलिसांनी कुणाल कामराने ज्या शोमधून एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून टीका केली त्या शोला उपस्थित असलेल्या काही प्रेक्षकांना समन्स बजावले आहेत. जे प्रेक्षक त्या दिवशी कार्यक्रम पाहण्यासाठी आले होते त्यांचा पोलिसांकडून जबाब नोंदवला जाणार आहे.
राज्यात आता ई-बाईक आणि ई-टॅक्सी सेवा अधिकृतपणे सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. परिवहन विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीवर शिवसेना ठाकरे गराचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर भारतीय जनता पक्षाच्या आमदार चित्रा वाघ यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. उबाठांनी पाळलेल्या पोपटाने भाकड भविष्य सांगण्यापेक्षा स्वतःच्या गटाला पडलेले खिंडार सांभाळा, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ४ आणि ५ एप्रिलला पुण्यात राज्यभरातील जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यात राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, तसेच महत्त्वाचे महसूल अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
हरणांची शिकार करणारा सतीश भोसले उर्फ खोक्या प्रकरणात मला अडकवण्याचा मोठा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणात बिश्नोई समाजाचे लोक विमानाची तिकीटं फाडून थेट मुंबईत आणली गेली. बिश्नोई समाजाच्या लोकांना सुरेश धसांना खोक्यानं हरणाचं मांस कसं पुरवले याबाबत खोटी माहिती दिली. माझा खून करण्याचा डाव आखण्यात आला.
रेडी रेकनरच्या दरात वाढ झाल्याने आता घर घेणे महागणार (Buying a new house) आहे. राज्य सरकारने 2025-26 या आर्थिक वर्षासाठी मालमत्तांच्या रेडी रेकनर (वार्षिक मूल्य दरतक्ते) दरात सरासरी 4.39 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा अनावश्यकपणे उकरून काढला जात आहे. ज्यांची श्रद्धा असेल ते लोक औरंगजेबाच्या कबरीवर जातील, असे स्पष्ट विधान करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैय्याजी जोशी यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. कबर भारताच्या उदारतेचं, सर्वसमावेशकतेचं प्रतीक असल्याचेही ते म्हणाले.
आका किंवा त्यांच्या समर्थकांना अमरावती किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? शोलेमध्ये आम्ही पाहिलंय की अधिकारी म्हणतात ‘जेल के कोने कोने में हमारे जासूस है’. मग हे जासूस काय करत होते? कालिया चित्रपटात आम्ही तुरुंगात झालेल्या हाणामाऱ्या पाहिल्या होत्या आम्ही. आता बीडच्या तुरुंगात कालिया तयार झालाय की काय कुणास ठाऊक, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.
ईव्हीएम घोटाळ्यावरून आमचा गडी केव्हा राजीनामा देतो याची मी वाट पाहत होतो, असा टाेला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार राेहित पवार यांना लगावला आहे.