Eknath Shinde तुम्ही अत्यंत चिल्लर लोक, संजय राऊत यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल
हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे नाहीत, हे फार किरकोळ लोक आहेत. बाळासाहेबांशी त्यांनी तुलना करू नये. ते अत्यंत चिल्लर लोक आहेत
हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे नाहीत, हे फार किरकोळ लोक आहेत. बाळासाहेबांशी त्यांनी तुलना करू नये. ते अत्यंत चिल्लर लोक आहेत
काँग्रेस सरकारने सत्तेचे विकेंद्रीकरण केले पण मोदी सरकारचे धोरण मात्र सत्ता केंद्रीत करण्याचे आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशाचे प्रतिनिधित्व केवळ काही आमदार, खासदार करणे कठीण आहे म्हणून नगरसेवक, सरपंच, सभापती, महापौर असे सत्तेचे विकेंद्रीकरण केले होते पण भाजपाला सत्ता त्यांच्या हातात हवी आहे आणि हट्टामुळेच तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. प्रशासन राज सुरु असून सामान्य माणसांच्या अधिकारांवर गदा आली आहे असेही असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केला.
छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याची रोल्स रॉईस कार पिंपरी चिंचवड येथील बिल्डर तुषार कलाटे यांच्या फार्म हाऊसवर सापडली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात अनेकदा मी सांगून सुद्धा कोणतेही कायदे निर्माण झालेले नाहीत.
कर्जाचे पैसे भरा. या वर्षी आणि पुढच्या वर्षीही शेतकरी कर्जमाफी होणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. पण, एका पराभवाने खचून जाणारी आम्ही माणसे नाहीत. राजकीय परिस्थिती पाहता खंबीर वैचारिक लढा देण्याची हीच ती वेळ आहे
वाघ्या कुत्र्याच्या समाधी वादावर संताप व्यक्त करत राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला तुमच्या या वादात रस नाही. राज्यातील नेत्यांना हात जोडून आणि साष्टांग नमस्कार घालून विनंती करतो, असे वाद उकरून काढू नका, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांचे नाव न घेता केले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याला सभागृहात बोलू दिले जात नसल्याचा आरोप केला आहे. बोलायची वेळ दिली तेव्हा तुम्ही व्हिएतनाममध्ये होता. सभागृह तुमच्या मर्जीने चालणार आणि असे प्रत्युत्तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी रात्री खालावली.
काँग्रेस पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ देण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संघटनात्मक फेरबदलाची प्रक्रिया सुरु केली आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने Kunal Kamra त्याची अटक टाळण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली.
पिंपरी विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.निवडीला दोन दिवस पूर्ण होत नाही तोच आता मुंबई उच्च न्यायालयाकडून बनसोडेंना हजर होण्याचे आदेश आले आहेत.