Prashant Koratkar प्रशांत कोरटकर यांच्यावर न्यायालयातच वकिलाचा हल्ला
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेले पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच हल्ला चढविला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणी अटकेत असलेले पत्रकार प्रशांत कोरटकर यांच्यावर एका वकिलाने न्यायालयातच हल्ला चढविला.
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र पैशाचे सोंग आणता येत नाही
महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खोचक सल्ला दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळामध्ये काम केलं तर त्यांना त्या विषयाचा अर्थ समजेल. पाच दहा मिनिटे हजेरी लावून काही समजणार नाही, असे ते म्हणाले.
म्यानमार, थायलंड, बांग्लादेशात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी आहे. भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेला धोका ठरतील अशांना देशात प्रवेश दिला जाणार नाही. देश म्हणजे ‘धर्मशाळा’ नाही, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला आहे. जर कोणी देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी देशात येत असेल तर त्यांचे नेहमीच स्वागत आहे,” असेही शाह यावेळी म्हणाले.
माझ्या बाळाच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू पाहिलं ही भावना शब्दात मांडता येणार नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि कक्षातील सर्व लोक आमच्यासाठी देवदूतच ठरले. त्यांनी आम्हाला या संकटातून बाहेर काढलं. हे उपकार आम्ही आयुष्यभर विसरणार नाही,” अशा शब्दांत बाळाच्या आईने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सरकारविरोधात कंटेटचा प्रचार करण्याकरता स्टॅंडअप काॅमेडियन कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा आराेप शिवसेना (शिंदे गट) युवासेना सरचिटणीस राहुल कनाल यांनी केला आहे. कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गद्दार म्हणत अप्रत्यक्ष विडंबन गीत सादर केले हाेते. हे गीत सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने स्टुडिओची ताेडफाेड केली हाेती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावरील टिप्पणीमुळे दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने Kunal Kamra मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. यानंतर थेट ‘पीएम किसान सन्मान योजने’त बांगलादेशी घुसखोर लाभार्थी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासदंर्भात आकडेवारी समोर आणत दावा केला होता.
माजी मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बजरंग खरमाटे यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) चौकशी करण्यात येणार आहे. परिवहन विभागातील सेवानिवृत्त अधिकारी बजरंग खरमाटेच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत चौकशीची घोषणा केली आहे. सेवानिवृत्तीनंतरही परिवहन विभागाशी संबंधित बैठका घेऊन भ्रष्टाचार करत असल्याचा खरमाटेवर आरोप आहे.
मोदी सरकारचा कारभार म्हणजे ‘दाल में कुछ काला’ नाही तर अख्खी डाळच काळी आहे. त्यांची नियत खोटी आहे आणि निती तर नाहीच. अशा शक्तीविरोधात आपल्याला लढायचे आहे. कामगारांचे शोषण होत असताना आपण शांत बसून चालणार नाही. त्यामुळे कृती कार्यक्रम घेऊन काम करा आणि मोठी चळवळ उभी करून एकत्र येऊन लढा द्या, असे आवाहनही सपकाळ यांनी केले.