Walmik Karad ; वाल्मिक कराडच्या वकिलाकडून कोर्टात आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल
वाल्मिक कराडच्या वकिलाकडून कोर्टात आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर लावलेले आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हंटलं आहे.
वाल्मिक कराडच्या वकिलाकडून कोर्टात आरोप मुक्तीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. वाल्मिक कराड याच्यावर लावलेले आरोप मान्य नसल्याचं कराडच्या वकिलांनी म्हंटलं आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटविण्याची मागणी केली आहे. वाघ्या कुत्र्याची कथा ही कपालकल्पीत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यावरून शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. रायगडवरच्या वाघ्या कुत्र्याची कथा ही सत्य आहे, संभाजीराजे भोसले जे बोललेत ते चुकीचं आहे असा दावा संभाजी भिडेंनी केला.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपींपैकी तीन आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुलीदिली आहे.
एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेच्या उपाध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर विराजमान होतो हे आपल्या संविधानाचे सामर्थ्य आहे, असे स्पष्ट करत विधानसभेच्या उपाध्यक्षपदी सदस्य अण्णा बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.
राज्याचे मत्स्यपालन आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी राजकीय फायद्यासाठी दोन धर्मात तेढ निर्माण व्हावी या उद्देशाने सातत्याने वादग्रस्त विधाने केली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे याचाच अर्थ राज्यातले सामाजिक सौहार्द आणि शांतता बिघडावी हे राज्य सरकारचे धोरण आहे, असा आराेप काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून तिच्यावर सामुहिक बलात्कार झाल्याचा आराेप केला आहे.
ईडी अन् काय काय म्हणता. पण आणिबाणीच्या काळात विराेधी पक्षाच्या एक लाखांहून अधिक लाेकांना जेलमध्ये टाकले. जाॅर्ज फर्नांडिस यांच्या कुटुंबासोबत जे काही झाले
संविधान किती मोठे आहे, हे आज आपण पाहू शकतो. चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान, रिक्षा चालवणारे मुख्यमंत्री, पान टपरी चालवली ते विधानसभेचे उपाध्यक्ष झाले.
:बुलढाणा जिल्ह्याच्या तीन तालुक्यातील हजारो लोकांना केस गळतीच्या गंभीर त्रासाला सामारे जावे लागले. केस गळतीने टक्कल पडण्याचा प्रकार वाढत असताना त्यामागे काय कारण आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे म्हणणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. वाढीव मुदत देण्यासही नकार दिला आहे. कुणाल कामरा सध्या पुद्दुचेरी येथे आहे.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रेय भरणे यांची वाशिम जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे म्हणणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. वाढीव मुदत देण्यासही नकार दिला आहे. कुणाल कामरा सध्या पुद्दुचेरी येथे आहे.