महाराष्ट्रात खरेच वाढली गुन्हेगारी?, मुख्यमंत्र्यांनी दिली संपूर्ण देशाची आकडेवारी
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारी वाढल्याच आरोप विरोधक करत आहेत
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गुन्हेगारीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन गुन्हेगारी वाढल्याच आरोप विरोधक करत आहेत
नागपूर दंगलीचे मालेगाव, बांगला देश कनेक्शन समोर आले आहे. लोकांची माथी भडकावून दंगल पेटविण्यासाठी बांगला देशातील आयपी आड्रेसवरून व्हिडीओ व्हायरल करण्यात आले.
जेव्हा आपण मंत्री असतो तेव्हा संयमानेच बोलले पाहिजे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी राजधर्माचे पालन करण्याबाबत विधान केले होते. त्यामुळे आपले विचार, आपल्या आवडी-निवडी या बाजूला ठेवल्या पाहिजेत. आपण संविधानाची शपथ घेतलेली आहे.
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: Amit Shah निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मी येथपर्यंत पोहोचलो आहे. सात निवडणुकांमध्ये मी विजय मिळवला आहे. कोणाच्या
दिशा सालियनची हत्या झाली होती आणि तिच्या वडिलांन आज जी नावे घेतली ती पहिल्या दिवसांपासून सांगत होतो. यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला.
दिशा सालियनच्या कुटुंबाला आताच का जाग आली? हे आरोप पैशांच्या नादी लागूनच केलेत. तिच्या वडिलांना कोणाचे तरी सतत फोन यायचे. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वकाही चालू आहे. एक आरोप करून झाला, आता दुसरा आरोप सुरू केला आहे. दुसरं काय? असे म्हणत हे आरोप राजकीय असल्याचा दावा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
बॉलीवूडचा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशी संबधित असलेले दिशा सालियन Disha Salian प्रकरणावर दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा २०२५ या परीक्षेची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. ही परीक्षा आता वर्णनात्मक स्वरुपात घेण्यात येणार आहे. मात्र या स्वरुपाला विद्यार्थ्यांकडून विरोध केला जात होता. मात्र ही परीक्षा वर्णात्मक स्वरुपातच होणार असून कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
नागपूर शहरातील महाल परिसरात सोमवारी दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारादरम्यान, कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा जमावातील काही लोकांकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेची तातडीने चौकशी करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत
पुणे शहर परिसरात अशा प्रकारची कोणतीही कोयता गँग अथवा कोयत्याचा वापर करून संघटित गुन्हेगारी करणारी टोळी अस्तित्वात नाही. एरियाचा भाई होण्याच्या आकर्षणापोटी काही अल्पवयीन मुले कोयत्याचा वापर करत दहशत माजवत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.
आज सकाळी हिंजवडी फेज १ येथे मिनी बसला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली, यामध्ये प्रवास करणाऱ्या व्योमा ग्राफिक्स कंपनीतील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेची तातडीने सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित कंपनीमार्फत मृतांच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक करण्यासाठी शासनाने निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली. शासनाने संबंधित कंपनीवर जबाबदारी निश्चित करावी आणि कुटुंबीयांना न्याय द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
ओरंगजेबाची कबर आणि नागपूर हिंसाचार यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाष्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर राजकारणी कीड अशी जहरी टीका केली. शिवसेना शिंदे गटानेही आदित्य यांच्यावर सूर्याजी पिसाळ असा निशाणा साधला आहे.