सौरव जोशीच्या दाव्याने ‘E20’वरून वाद; मर्सिडीज कंपनीने दिले स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :- देशातील सुप्रसिद्ध ब्लॉगर Sourav Joshi  सौरभ जोशी याने त्याच्या मर्सडिजचे मायलेज वेगाने कमी झाल्याचा दावा केल्यामुळे सोशल मीडियावर इथेनॉल इंधनाबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मर्सिडीज-बेंझ इंडिया कंपनी आणि केंद्र सरकारने हे दावे फेटाळून लावत E20 पेट्रोल पूर्णपणे सुरक्षित असल्याचे म्हटले आहे.

नेमका काय आहे वाद?
उत्तराखंडमधील प्रसिद्ध व्लॉगर सौरव जोशीने त्याच्या नवीन व्हिडिओमध्ये त्याच्या मर्सिडीज-बेंझ जीएलसी या लक्झरी कारच्या मायलेजबाबत चिंता व्यक्त केली. सौरवच्या दाव्यानुसार, पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या E20 पेट्रोलमुळे त्याच्या कारचे मायलेज अवघ्या ४८ तासांत १७ किमी प्रतिलिटरवरून थेट ५ किमी प्रतिलिटरवर घसरले आहे. आधी फुल टँक केल्यानंतर कार ८०० किलोमीटरची रेंज दाखवायची, जी आता थेट ४८० किमी दाखवत आहे. यामुळे महागड्या गाड्यांचे इंजिन खराब होण्याची भीती त्याने व्यक्त केली.


बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या, राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन


मर्सिडीज-बेंझ कंपनीचे स्पष्टीकरण
सौरव जोशीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मर्सिडीज-बेंझ इंडियाने अधिकृत पत्रक जारी करत ग्राहकांना खात्री दिली आहे. कंपनीने म्हटले आहे की “आमच्या सर्व बीएस-६ पेट्रोल गाड्या E20 इंधनासाठी पूर्णपणे सक्षम आहेत आणि संबंधित सरकारी प्राधिकरणांनी त्यांना प्रमाणित केले आहे. त्यामुळे आमच्या वाहनांना या इंधनामुळे कोणताही तांत्रिक धोका नाही.”

काही वाहन तज्ज्ञांच्या मते, सौरवने व्हिडिओमध्ये दाखवलेले मायलेज हे ‘रिअल-टाइम’ असू शकते जे ट्रॅफिक, रस्ता आणि ड्रायव्हिंग पद्धतीनुसार बदलत राहते. तसेच, पेट्रोलमधील भेसळ हे देखील मायलेज कमी होण्याचे एक कारण असू शकते, ज्याचा इथेनॉल मिश्रणाशी संबंध नाही.

सरकारची भूमिका काय?

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी याआधीच स्पष्ट केले आहे की, देशात कोट्यवधी वाहने E20 इंधनावर सुरक्षितपणे चालत आहेत. इथेनॉल मिश्रणामुळे मायलेजमध्ये जास्तीत जास्त ३ ते ५ टक्के किरकोळ घट होऊ शकते, परंतु थेट ५ वर मायलेज येणे अशक्य आहे. सोशल मीडियावरील अशा अपुऱ्या माहितीवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Sourav Joshi’s claim sparks controversy over ‘E20’; Mercedes issues clarification.

महत्वाच्या बातम्या