विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने साेमवारी एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणाऱ्या नेत्यांच्या यादीत देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत तिसरे स्थान पटकावले आहे. 12 जुलै 2026 पर्यंत फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ 2,430 दिवसांचा (सुमारे 6 वर्षे 7 महिने) झाला असून, त्यांचा हा कार्यकाळ अद्यापही सुरू आहे. Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. 12 जुलै 2026 पर्यंत त्यांनी मुख्यमंत्रिपदाचे 2,430 दिवस पूर्ण केले आहेत. शरद पवार यांनी जुलै 1978 मध्ये वयाच्या 37व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेल्या शरद पवार यांनी चार वेळा या पदाची धुरा सांभाळली. मात्र, त्यांच्या नावावर एकूण 2,412 दिवस इतका कार्यकाळ जमा आहे.
शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही पूर्ण 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 असा सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
राज्याच्या इतिहासात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद वसंतराव नाईक: 4,096 दिवस (11 वर्षे 78 दिवस) यांनी भूषविले आहे. 5 डिसेंबर 1963 ते 20 फेब्रुवारी 1975 असे प्रदीर्घ काळ ते मुख्यमंत्री हाेते. दाेन वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे विलासराव देशमुख सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 2,686 दिवस (सुमारे 7 वर्षे 129 दिवस) मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस असून त्यांनी 2,430 दिवस (सुमारे 6 वर्षे 7 महिने) पूणे केले आहेत. त्यांचा कार्यकाळ अद्याप सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस 5 वेळा आमदार होत्या. वडील गंगाधरपंतही आमदार होते. अभाविपचे कार्यकर्ते आणि वॉर्डातील एका ‘बूथवरील कार्यकर्ता’ म्हणून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली.1992 ते 2001 या काळात ते सलग नगरसेवक राहिले. याच काळात त्यांना सर्वात कमी वयात नागपूरचे महापौरपद भूषवण्याची संधीही मिळाली.