विशेष प्रतिनिधी
पुणे: PSI Sandeep Kadam डेक्कन जिमखाना परिसरातील मध्यरात्रीनंतर सुरू असलेल्या कॅफे आणि हॉटेलांवर धडक कारवाई करणारे डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संदीप कदम यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विभागीय आढावा समितीने त्यांच्या निलंबनाचा आदेश रद्द केला असून, त्यांना तत्काळ पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.PSI Sandeep Kadam
२९ जून रोजी डेक्कन परिसरातील काही कॅफे आणि हॉटेल्स नियोजित वेळेनंतर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पीएसआय कदम यांनी पोलिसांच्या पथकासह कारवाई केली होती. या कारवाईदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओतील कथित वर्तनावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.PSI Sandeep Kadam
मात्र, या कारवाईनंतर पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध सामाजिक स्तरांतून कदम यांच्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली होती. कायद्याची अंमलबजावणी करताना त्यांनी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून कारवाई केली होती, असा युक्तिवाद अनेकांनी केला होता.
त्यानंतर संबंधित प्रकरणाचा विभागीय आढावा समितीने सखोल आढावा घेतला. कारवाईची परिस्थिती, उपलब्ध पुरावे आणि संबंधित बाबींचा विचार केल्यानंतर समितीने निलंबनाचा निर्णय मागे घेण्याची शिफारस केली. त्यानुसार त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले असून, त्यांना पुन्हा सेवेत हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या निर्णयानंतर पोलीस वर्तुळात समाधान व्यक्त केले जात असून, कर्तव्य बजावताना कठोर निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना यामुळे दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. तसेच कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन उभे राहते, असा सकारात्मक संदेश या निर्णयातून गेल्याचे मतही व्यक्त करण्यात येत आहे.
PSI Sandeep Kadam’s suspension revoked, Deccan officer who cracked down on cafes ordered to rejoin duty
महत्वाच्या बातम्या