Rohit Pawar : बड्या नेत्यांचे व्ही. के. सिंग याला संरक्षण, राेहित पवार यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग याला बड्या नेत्यांचे संरक्षण असल्याचा आराेप राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी दिल्लीत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेऊन हा मुद्दा संसदेत उपस्थित करण्याची मागणी केली. Rohit Pawar

अजितदादांचे विमान पडले की पाडले गेले? हा आमचा साधा प्रश्न आहे,” असे विचारत राेहित पवार यांनी ‘व्हीएसआर’ (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य केले आहे. बड्या नेत्यांकडून व्ही. के. सिंगला संरक्षण असल्याचा दावा रोहित पवारांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यां म्हणाले, “अपघाताच्या दिवशी दृष्यमानता (Visibility) ५ हजारच्या खाली असताना कॅप्टन कपूर यांनी व्ही. के. सिंग यांना फोन केला होता. ‘व्हिजिबिलिटी खराब आहे, मी उड्डाण करू शकत नाही’ असे वैमानिकाने स्पष्ट सांगितले होते. मात्र, त्यावर व्ही. के. सिंग यांनी ‘तू टेकऑफ कर, बाकी नंतर पाहून घेतो’ असा आदेश दिला. सीआयडीने व्ही. के. सिंग यांचे कॉल रेकॉर्ड्स (CDR) तपासले, तर हे संभाषण समोर येईल.” Rohit Pawar



वैमानिक कपूर यांच्याबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले की, “कपूर पूर्वी मद्यप्राशन करायचा याचे पुरावे आम्ही दिले आहेत. मात्र, आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, अजितदादांचे विमान उडवत असताना त्याच्या रक्तात दारू, ड्रग्ज किंवा विष आढळलेले नाही. मग जर तो शुद्धीवर होता आणि व्हिजिबिलिटी कमी होती, तर त्याने उड्डाणाचे धाडस का केले? त्याच्यावर कुणाचा दबाव होता का? याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. व्ही. के. सिंग स्वत:हून पुढे येऊन मीडियासमोर काही सांगत असेल, तर त्याला पुराव्यानिशी प्रत्युत्तर देऊ.”

व्ही. के. सिंग यांना जाणीवपूर्वक वाचवले जात असल्याचा आरोप करत रोहित पवार यांनी ‘राजस्थान कनेक्शन’ उघड केले. “व्ही. के. सिंगचा मुलगा रोहित सिंग याच्या लग्नात कुणीही जाऊ शकतो, हे मी समजू शकतो. पण आज जे सत्तेत आहेत, ते लोक रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथे लग्नात अहुजा नावाचा सिंगर गाणे गात असताना प्रफुल पटेल तर होतेच, त्याचबरोबर त्यांचा मित्र एस. एन. शर्मा हा देखील त्या लग्नाला होता. यासोबतच अनेक मोठमोठे नेते देखील होते.मी प्रफुल पटेलांना विनंती केलीये की, तुम्ही जर अजितदादांच्या जवळचे असाल, आणि तुम्ही त्या लग्नाला होताच, तर त्या लग्नात आणखी कोण होते? त्यांची लोकांना समोर येऊन सांगा. लग्नात असणारी लोक पॉवरफुल आहेत. ही लोक रोहित सिंगच्या लग्नात जात असतील, तर १०० टक्के कुठे ना कुठे व्ही. के. सिंग, रोहित सिंग आणि व्हीएसआरला याच मोठ्या नेत्यांकडून वाचवले जात असल्याचे सिद्ध होते,” असा दावा रोहित पवारांनी केला. Rohit Pawar

मी सातत्याचे सांगतोय की, मला व्ही. के. सिंग आणि व्हीएसआरचे काही देणेघेणे नाही. पण व्हीएसआरच्या विमानात अजितदादा प्रवास करत असताना, विमान हे पाडण्यात आले की पडले? हा माझा साधा आणि Rohit Pawarसोपा प्रश्न आहे. व्ही. के. सिंगचा तपास ज्या दिशेने चाललाय त्यावरून त्याला वाचवले जात असल्याचे आम्हाला वाटत आहे. कारण व्ही. के. सिंगला ताब्यात घेतले, तर तो काही लोकांची नावे घेईल. त्यामुळे काही लोकांना भीती वाटतीये, असे आम्हाला वाटत आहे.

आम्हाला मिळणारी माहिती पत्रकारांकडून, आमच्या काही एजन्सीकडून कळते. व्हीएसआरच्याच काही लोकांकडूनही ही माहिती कळते. अजिदादांच्या हितचिंतक लोकांकडून देखील कळते. ही माहिती फक्त आम्ही पुढे आणतोय. त्यावर शहानिशा करणे, त्याचा तपास करणे हे सीआयडीचे काम आहे. जर व्हिजिबिलीटी ५ हजारच्या खाली असते, तर कुठलाही पायलट विमान उडवत नाही. मग कॅप्टन कपूरला एवढी हिंमत आली कशी? तेवढे धाडस कसे झाले? धाडस देणार व्ही. के. सिंग होता का? असा प्रश्न निर्माण होतो, असेही रोहित पवार म्हणाले.

Big leaders protect V. K. Singh, alleges Rohit Pawar