विशेष प्रतिनिधी
पुणे : गुडलक चौकातील ‘कलाकार कट्टा’ हटवण्याबाबत निर्माण झालेल्या वादात आता माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनंतर नवे वळण आले आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्याचा आरोप करून काही स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी हा कट्टा हटवण्याची मागणी केली होती. मात्र डेक्कन वाहतूक शाखा आणि डेक्कन पोलीस ठाण्याकडून माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरांनुसार मागील तीन ते चार वर्षांत कलाकार कट्ट्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्याची एकही अधिकृत नोंद नसल्याचे स्पष्ट झाले आहे. Kalakar Katta
गुडलक चौक परिसरातील कलाकार कट्टा हा अनेक वर्षांपासून चित्रकार, छायाचित्रकार आणि विविध कलाक्षेत्रातील तरुणांसाठी भेटीगाठींचे तसेच संवादाचे ठिकाण म्हणून ओळखला जातो. अलीकडे या कट्ट्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचा आणि स्थानिक नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा करत काही भाजप पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन दिले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाने माहिती अधिकारातून संबंधित विभागांकडून माहिती मागवली होती. Kalakar Katta
डेक्कन वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार कलाकार कट्ट्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण झाल्याची कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. तसेच या ठिकाणामुळे वाहतूक व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्याबाबत कोणतीही तक्रार नोंदविण्यात आलेली नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे डेक्कन पोलीस ठाण्याकडूनही मिळालेल्या उत्तरात कलाकार कट्ट्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची किंवा स्थानिक नागरिकांकडून तक्रारी प्राप्त झाल्याची कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले आहे. Kalakar Katta
दरम्यान, या संदर्भात सुनील पांडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केलेल्या अर्जामध्ये स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी होत असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरांनुसार अशा प्रकारच्या तक्रारी ना डेक्कन पोलीस ठाण्यात नोंदविल्या आहेत, ना वाहतूक शाखेकडे उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याबाबत राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, माहिती अधिकारातून मिळालेली दोन्ही उत्तरे स्पष्टपणे दर्शवितात की कलाकार कट्ट्यामुळे वाहतुकीचा किंवा कायदा-सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण झालेला नाही. त्यामुळे हा कट्टा हटवण्यामागील कारणे वस्तुस्थितीला धरून नसल्याचा संशय निर्माण होत आहे. पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात कलाकारांसाठी उभा राहिलेला हा कट्टा अनेक वर्षांपासून सर्जनशील संवादाचे केंद्र राहिला आहे. Kalakar Katta
कलाकार कट्ट्याला लक्ष्य करून त्याचे स्थलांतर किंवा हटवण्याचा प्रयत्न अन्यायकारक असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. माहिती अधिकारातून समोर आलेल्या या तपशीलामुळे कलाकार कट्टा हटवण्याच्या मागणीवर नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महापालिका प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
New Twist in Goodluck Chowk ‘Kalakar Katta’ Row; No Official Record of Traffic Obstruction
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
- Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित
- Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका
- पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, अनेक विद्यार्थी जखमी!