Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uday Samant  दावोस येथे २०२२ ते २०२५ दरम्यान झालेल्या गुंतवणूक करारांबाबतची सविस्तर माहिती देणारी ‘भगवी पत्रिका’ लवकरच विधान परिषदेत सादर करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. या पत्रिकेत करारांची अंमलबजावणी, प्रत्यक्षात सुरू झालेले प्रकल्प, प्रक्रियेत असलेले प्रकल्प तसेच प्रलंबित असलेल्या प्रकल्पांचा तपशील दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Uday Samant

विधान परिषदेत बुधवारी नियम २६० अंतर्गत मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना सामंत बोलत होते. दावोस येथे झालेल्या करारांवर सभागृहात सविस्तर चर्चा व्हावी यासाठी ही ‘भगवी पत्रिका’ सादर केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.Uday Samant

सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये सुमारे ८० हजार कोटी रुपयांचे एमओयू झाले होते. त्यापैकी ९८ टक्के करारांची अंमलबजावणी झाली आहे. २०२३ मध्ये १ लाख ३७ हजार कोटी रुपयांचे करार झाले असून त्यापैकी ८० टक्के प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. २०२४ मध्ये ३ लाख १६ हजार ७३९ कोटी रुपयांच्या करारांपैकी सुमारे ७० टक्के अंमलबजावणी झाली आहे. तर २०२५ मध्ये १२ लाख २३ हजार ८१ कोटी रुपयांचे करार झाले असून त्यापैकी ८८ टक्के करारांची अंमलबजावणी झाल्याचे त्यांनी सांगितले.Uday Samant



याशिवाय यावर्षी सुमारे ३१ लाख कोटी रुपयांचे करार करण्यात आले असून त्यामध्ये उद्योग विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) यांचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्योग विकासासाठी राज्यात विविध प्रकल्प राबवले जात असल्याची माहिती देताना सामंत म्हणाले की, रायगड जिल्ह्यात बल्क ड्रग पार्क प्रकल्प उभारण्यात येत असून त्यासाठी सुमारे १००० हेक्टर जमीन देण्यात आली आहे. तसेच उद्योगवृद्धीसाठी राज्य सरकारने १२ नवीन धोरणे जाहीर केली असून त्यामध्ये औद्योगिक धोरण, जीसीसी धोरण, रत्न आणि दागिने धोरण, बांबू धोरण आदींचा समावेश आहे.

कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी रतन टाटा यांच्या नावाने पाच कौशल्य विकास केंद्रे सुरू करण्यात आली असून त्यासाठी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

जागतिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचांवर सहभाग आवश्यक असल्याचे नमूद करत सामंत म्हणाले की, महाराष्ट्रातील औद्योगिक वाढ आणि परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सातत्याने सुरू राहतील.

‘Saffron Paper’ on Davos Deals to Be Presented Soon, Says Minister Uday Samant

महत्वाच्या बातम्या