Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यसभेच्या जागेसाठी संख्याबळानुसार उबाठा गटाचे पारडे जड असताना समीकरणे फिरवत मविआकडून संजय राऊतांच्या मर्जीतील शरद पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. स्वत:ची राज्यसभा सुरक्षित करण्यासाठी राऊतांनी धूर्त डाव टाकला. या निर्णयावरून उबाठा गटाच्या निर्णय प्रक्रीयेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला किंमत उरली नसून सर्व निर्णय हे संजय राऊतांच्या मर्जीनुसारच घेतले जातात हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न राऊतांनी केला असल्याची टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केली. Navnath Bane

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कट कारस्थान करत उबाठा गटाचे आपणच प्रति पक्षप्रमुख असल्याचे सिद्ध करत राऊतांनी एका दगडात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि प्रियांका चतुर्वेदी या तीन पक्षांना घायाळ केले आहे असा घणाघात बन यांनी केला. Navnath Bane



यावेळी बन म्हणाले की, महिनाभरापूर्वीच राऊतांनी मविआकडून शरद पवार यांचे नाव जाहीर केले होते आणि राऊतांचा तोच निर्णय काँग्रेस आणि उबाठा गटावर लादला गेला. शरद पवारांप्रति असलेल्या प्रेमापोटी नव्हे तर प्रियांका चतुर्वेदी यांचे उबाठा गटामधील वाढणारे अस्तित्व कमी करून त्यांचे पंख छाटण्यासाठी राऊतांनी शरद पवारांचे नाव पुढे केले होते. सर्वात कमी संख्याबळ असतानाही शरद पवारांना उमेदवारी घोषित झाली यावरूनच मविआमध्ये काँग्रेसची अवस्था तर वापरून फेकून द्यावे तशी कढीपत्त्यासारखी झाली आहे. उद्धव ठाकरे तर विधानपरिषदेकडे डोळे लावून बसल्याने त्यांच्यासमोर या निर्णयाला मम म्हणण्याशिवाय पर्यायच उरला नसल्याचाही टोला त्यांनी लगावला.

दोन राष्ट्रवादींचे विलिनीकरण करायचे की नाही हा निर्णय घेण्यास आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष सुनेत्राताई पवार सक्षम आहेत. सुनेत्राताईंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय उत्तमरित्या प्रगती करेल असा विश्वास व्यक्त करत श्री. बन म्हणाले की, सुनेत्राताईंना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची गरज उरलेली नाही. मविआकडून शरद पवारांचे नाव घोषित करण्याआधी शप राष्ट्रवादीसमोर राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी न करण्याची अटच घातली होती. मात्र शरद पवारांचा स्वभाव आणि कमकुवत झालेल्या राष्ट्रवादीला ही अट कितपत पेलेल ही शंकाच आहे असे म्हणत त्यांनी खिल्ली उडवली. Navnath Bane

Sanjay Raut, Not Uddhav Thackeray, Now Making Decisions for UBT Faction, Alleges Navnath Bane

महत्वाच्या बातम्या