विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील माजी नगरसेवक वसंत कृष्णाजी मोरे यांच्या विरोधात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी ॲक्ट) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, विश्वनाथ तुकाराम लहाडे (वय ७२) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
२५ फेब्रुवारी रोजी पुणे महानगरपालिकेत वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी फिर्यादी विश्वनाथ लहाडे यांचा उल्लेख करत काही वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, वसंत मोरे यांना आपण अनुसूचित जातीचे असल्याची माहिती असतानाही त्यांनी जाणीवपूर्वक व हेतूपूर्वक आपल्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले.तक्रारीनुसार, वसंत मोरे यांनी “लहाडे इतका दारू पिला होता की त्याला बोलताही येत नव्हते, ओढ्यामध्ये उतरून गटारे साफ करत आहे” असे वक्तव्य केले.
तसेच हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादींनी केला आहे. या व्हायरल व्हिडिओमुळे आपली सामाजिक बदनामी झाली असून, कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सध्या कुटुंबीय भीतीच्या आणि तणावाच्या वातावरणात असल्याचेही फिर्यादींनी पोलिसांना सांगितले आहे.या तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी वसंत मोरे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
Vasant More Booked Under Atrocities Act for Alleged Insulting Remarks
महत्वाच्या बातम्या
- Uday Samant : दावोस करारांवर लवकरच ‘भगवी पत्रिका’; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती
- Mundhe : तुकाराम मुंडे यांचा कारवाईचा बडगा, बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देणारे 316 अधिकारी – कर्मचारी निलंबित
- Navnath Bane : उबाठा गटाचे निर्णय आता उद्धव ठाकरे नव्हे, तर संजय राऊत घेऊ लागलेत ! नवनाथ बन यांची टीका
- पुण्यातील प्रसिद्ध वसतिगृहात विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीमार; कारणही धक्कादायक, अनेक विद्यार्थी जखमी!