Devendra Fadanvis : राज्याची अर्थव्यवस्था 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार; मुख्यमंत्र्यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Devendra Fadanvis राज्याचा सन 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प आज (06 मार्च) विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडला जात आहे. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल अर्थसंकल्प मांडत आहेत. महत्त्वाचे म्हणजे दिवंगत अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारकिर्दीतील दुसरा आणि मुख्यमंत्री म्हणून पहिला अर्थसंकल्प मांडला. देवेंद्र फडणवीस यांनी 2047 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर्सवर नेणार, असा विश्वास व्यक्त केला . 2035 मध्ये राज्याचा अमृत महोत्सव असल्याने यासाठी काही उद्दिष्टे देखील निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.Devendra Fadanvis

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 16व्या केंद्रीय वित्त आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार पुढील पाच वर्षांमध्ये राज्यासाठी भरीव निधी प्राप्त होणार असून आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्र शासनाने वाढीव निधी देण्याबाबत राज्याची मागणी मान्य केली आहे. याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. राज्य शासनाने देखील सहाव्या वित्त आयोगाची स्थापना केली होती. या वित्त आयोगाने विहित वेळेमध्ये आपला अहवाल सादर केला याकरिता आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांचेही आभार मानतो. हा अहवाल कृती अहवालासह राज्यपालांच्या मान्यतेनंतर पुढील अधिवेशनात सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची कारवाई करण्यात येईल. आयोगाच्या शिफारसींचा अभ्यास करून प्रशासकीय सुधारणा व आर्थिक विकेंद्रीकरणाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्था सक्षम करण्याची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.Devendra Fadanvis



देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केंद्र शासनाने युवा केंद्रित अर्थसंकल्प सादर केला, त्यात महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करण्याकरता भरीव अर्थसाहाय्य केले आहे. मुंबई पुणे व पुणे हैदराबाद या प्रस्तावित जलदगती रेल्वे प्रकल्पांमुळे सकल राज्य उत्पादनात मोठी वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्यातील जनतेच्या वतीने मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक इंजिन असल्याने विकसित भारत 2047 च्या स्वप्नपूर्तीत आपला वाटा सर्वात मोठा असेल. राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलर करणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे. या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विकसित महाराष्ट्र 2047 चे व्हिजन डॉक्युमेंट जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2019-30 पर्यंत साध्य करावयाची अल्पकालीन उद्दिष्टे पुढील प्रमाणे आहेत.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याचे अमृत महोत्सवी वर्ष सन 2035 पर्यंत साध्य करावयाची मध्यमकालीन उद्दिष्टे आणि भारतीय स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष सन 2047 पर्यंत साध्य करावयाची दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. राज्याचा प्रादेशिक संतुलित राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरता चार प्रमुख स्तंभ ठरवण्यात आले आहेत. एक प्रगतिशील दुसरं शाश्वत तिसरं सर्वसमावेशक आणि चौथं सुशासन या चार स्तंभाच्या अंतर्गत 16 उपक्षेत्रे निश्चित करण्यात आली आहेत. सन 2047 विकसित महाराष्ट्राची इमारत उभी करण्याकरिता इथून पुढे येणाऱ्या सर्व अर्थसंकल्पात विकसित महाराष्ट्राच्या संकल्पाचे प्रतिबिंब दिसणार आहे.

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई वसवणार मुंबई 3.0 असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडताना केली. तसेच मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था 140 वरून 300 अब्ज डॉलर पर्यंत नेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुंबई, पुणे व नागपूर – 490 किमी मेट्रोचे जाळ्याची घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली. तसेच पुण्यात खडकवासला – स्वारगेट – हडपसर – खराडी मार्गावर हडपसर ते लोणी काळभोर व हडपसर बस डेपो ते सासवड या दोन उपमार्गिकांना मान्यता दिली. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी पात्र शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी योजना जाहीर केली. तसेच मुंबईसाठीही त्यांनी भरीव तरतूद केल्याचे दिसले.

राज्याचे नवे गुंतवणूक आणि सेवा धोरण जाहीर

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र वन

– प्रत्येक जिल्ह्यात एमएसएमई केंद्र

उद्योजकता वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्यात सेवाक्षेत्र आयुक्तालय

गडचिरोली जिल्हा 70 हजारोंना अधिक रोजगार

गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास दोन लाख कोटींची गुंतवणूक होणार

रोजगार निर्मितीसाठी जागतिक क्षमता केंद्र

स्टार्टअप प्रोत्साहन करण्यासाठी विशेष योजना

मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी सुरू

जागतिक क्षमता केंद्राची सर्वाधिक पसंती पुण्याला

मुंबई दुबई सिंगापूर मध्ये पर्यटन गुंतवणूक कक्ष सुरू करणार

वासोटा किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे

– तिसरी चित्रनगरी नागपूर जिल्ह्यात रामटेक मध्ये

पाच ज्योतिर्लिंगांचा विकास आराखड्यासाठी तरतूद

महानुभाव पंथाच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा विकास

10 हुन सक्षम विकास प्राधिकरण स्थापन करणार

अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार

2030 पर्यंत एम एम आर ची अर्थव्यवस्था 300 अब्ज डॉलरपर्यंत नेणार

– एम एम आर मध्ये बेकायदा झोपडपट्ट्यांना आळा घालण्याचे नव धोरण

– एम एम आर मध्ये बेकायदा झोपडपट्ट्यांना आळा घालण्याचे नव धोरण

* मुंबई दुसरी भूमिगत मेट्रो सुरू करणार

– मुंबई पुणे नागपूर मध्ये 490 किमी मेट्रो मार्ग

दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न
राज्यात १ हजार २०० किमीचे मेट्रो मार्ग व ६ हजार किमीचे द्रुतगती मार्ग विकसित केले जातील

२०१९ पर्यंत १६५ किमी मार्गाचे मेट्रो मार्गिका तयार केल्या जातील

दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गासोबत जोडण्यासाठी २०२८ पर्यंत काम करण्याचे प्रयत्न आहेत

वर्सोवा भाईंदर किनारी मार्ग डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

पनवेल ते कर्जत अंतिम टप्प्यात, लवकरच वाहतुकीसाठी खुला करणार.

Maharashtra Economy to Reach $5 Trillion by 2047, Says Chief Minister

महत्वाच्या बातम्या