Rohit Pawar व्हीएसआर कंपनीच्या मागे प्रभावशाली लोक, नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची रोहित पवार यांची मागणी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते त्या व्हीएसआर कंपनीच्या मागे काही प्रभावशाली लोकांचा हात आहे. त्यामुळे या कंपनीवर अद्यापर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही, असा आरोप केला आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.Rohit Pawar

अजित पवार यांच्या बारामती येथील विमान अपघाताबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. रोहित पवार यांनी दिल्ली आणि मुंबईत पत्रकार परिषदा घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन व्हीएसआर विमान कंपनी, नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू आणि डीजीसीएतील अधिकारी कॅप्टन श्वेता सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.Rohit Pawar

रोहित पवार म्हणाले, अजितदादांच्या विमान अपघातासंबंधी मी प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर भाजप पुरस्कृत ट्रोलर्स माझ्याविरोधात सक्रीय झाले आहेत. मी कुठे फिरत आहे, कोणत्या विमानाने कुठे प्रवास करत आहे. माझ्यासोबत विमानात कोण होते, कोण सेलिब्रिटी माझ्यासोबत प्रवास करत होते, याची संपूर्ण माहिती ट्रोलर्सला मिळत आहे. मात्र आम्हाला हवाई वाहतूक मंत्रालयाकडून अजित दादांच्या विमान प्रवासाबद्दलची कोणतीच माहिती दिली जात नाही. महिती अधिकारात माहिती दिली जात नाही. मात्र त्याचवेळी ट्रोलर्सला माहिती कशी मिळाली?Rohit Pawar

रोहित पवार म्हणाले, अजित पवार विमानात जिथे बसले होते, त्याच्या मागे टॉयलेट सेक्शन होते. तिथे बॅगा ठेवल्या जातात. त्या जागी त्या दिवशी पेट्रोलचे अतिरिक्त कॅन ठेवण्यात आले होते. त्यामुळेच विमान पेटले होते असा आमचा आरोप आहे. या गोष्टींचा तपास करण्याची गरज आहे. तसेच या विमानात अनावश्यक पेट्रोल जास्त होते. हे पेट्रोल विमानात ठेवण्याची काहीच गरज नव्हती. हे पेट्रोल त्यांना हैदराबाद किंवा ते ज्या ठिकाणी जाणार होते तिथेही भरता आले असते. विमान मुंबईहून निघाले होते तेव्हाच त्यांनी एवढे पेट्रोल का भरले? असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे हा अपघात पूर्वनियोजित होता का? असा संशय आहे.Rohit Pawar



रोहित पवार यावेळी सादरीकरण करताना म्हणाले, आजच्या सादरीकरणात यापूर्वीच्या पत्रकार परिषदेहून वेगळी माहिती आहे. अजित पवारांच्या अपघातावेळी विमानाचा एकच स्फोट झाला नव्हता. अनेक स्फोट झाले होते. या प्रकरणी वैमानिकावर दबाव टाकला असेल किंवा त्याला ब्लॅकमेल करून ही घटना घडवली असेल. अहमदाबाद विमान अपघातावेळी बाह्य तपास यंत्रणांनी पायलटकडे बोट दाखवले होते. या प्रकरणी विश्लेषण केले आहे. व्हीएसआर कंपनीच्या संचलनात अनेक दोष आहेत. त्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे. तसेच या मागे कुणीतरी असण्याचीही शक्यता आहे.Rohit Pawar

रोहित पवार म्हणाले, या प्रकरणी कटकारस्थानाचा विचार केला. तर या प्रकरणी दोन प्रकारचे षडयंत्र आहे. एक राजकीय व दोन कमर्शियल. यापैकी एकाचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. विमान अपघाताला व्हीएसआर कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे त्या कंपनीला कुणी पाठिशी घालत असेल, तिला वाचवत असेल तर ते ही एक षडयंत्र असू शकते. या कंपनीच्या मागे खूप शक्तिशाली लोक आहेत. डीजीसीएचे अधिकारी यामागे आहेत. त्यामुळे आपल्याला अजित पवारांना न्याय मिळवून द्यायचा असेल तर महाराष्ट्राचे लोक, या देशातील जनता या प्रकरणी आपल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्यांचा आवाज इथपर्यंत पोहोचत आहेत.Rohit Pawar

या प्रकरणी न्याय करायचा असेल तर या देशातील सर्वात पॉवरफूल लोकांनी म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेच अजित पवारांना न्याय देऊ शकतात. कारण, या प्रकरणात हात असणारे खूप शक्तिशाली आहेत. त्यामुळे देशातील सर्वात ताकदवान असणाऱ्या या दोन नेत्यांनीच (मोदी-शहा) या प्रकरणाच्या तपासात लक्ष घालण्याची गरज आहे.Rohit Pawar

मी आज या प्रकरणी एक पत्र पंतप्रधान मोदींना पाठवणार आहे. कारण, मला त्यांच्या भेटीची वेळ मिळेल किंवा नाही हे माहिती नाही. पण आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही देशाच्या नागरी उड्डयण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत. मोदी व शहांकडे आम्ही ही मागणी करत आहोत. एवढेच नाही तर आम्ही विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही हा विषय आपल्या हातात घेण्याची विनंती करत आहोत. या प्रकरणी तेदेपाच्या उड्डयण मंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे, असे रोहित पवार म्हणाले.Rohit Pawar

Rohit Pawar Demands Resignation of Civil Aviation Minister Ram Mohan Naidu, Alleges Powerful Backing Behind VSR Company

महत्वाच्या बातम्या