विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला समर्थन देण्यासाठी विधानपरिषदेतील एका जागेवर काँग्रेस दावा करणार आहे. राज्यसभेसाठी शरद पवार यांना समर्थन देता येईल परंतु मविआ म्हणून विधान परिषदेत देखील एक जागा सोडण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविआ एकत्र चर्चा करत निर्णय घेणार आहे. Sharad Pawar
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येत राज्यसभेसाठी निर्णय घेण्यापूर्वी सर्व पक्षांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट करावी असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. एकीकडे दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित येण्याची चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबतीत मविआत संभ्रम निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेकरता पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत काँग्रेसची वेट अँड वॅाचची भुमिका असल्याचं दिसून येत आहे. अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास काँग्रेस वेगळा विचार करण्याच्या तयारीत आहे.Sharad Pawar
महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ७ जागांसह एकूण ३७ जागांसाठी बुधवारी भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी १६ मार्च रोजी मतदान होईल. विधानसभा निवडणुकीनंतर जवळपास निकालात निघालेल्या महाविकास आघाडीच्या ऐक्याची या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे सहा तर महाविकास आघाडीचा एकच उमेदवार राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. अर्थात त्यासाठी महविकास आघाडीची एकजूट महत्त्वाची असेल. Sharad Pawar
Congress’s conditions for supporting Sharad Pawar in Rajya Sabha
महत्वाच्या बातम्या
- स्वीकृत सदस्य म्हणजे काय? महानगरपालिका स्वीकृत सदस्यांची निवड कशी केली जाते?
- अजितदादांच्या अपघातग्रस्त विमानातील नाेंदणी साधनांचे आगीमुळे नुकसान, तपास यंत्रणेकडून प्रथमच अधिकृत माहिती
- खारगे समितीची पार्थ पवार यांना क्लिन चिट, राज्यसभेवर जाण्याचा मार्ग माेकळा
- Chief Minister : शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यास मुख्यमंत्र्यांची स्थगिती