सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट, आदित्य ठाकरे यांची टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई: सरकार खोदून काढायचे झाले तर सगळेच भ्रष्टाचाराने पोखरलेले आहेत. आजच्या सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखीच बनावट झाली आहेत. हे सरकार भ्रष्टाचाराने पोखरलेले असून जगात आमची नाचक्की होत आहे,” अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. Aditya Thackeray

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाच्या सुशोभिकरणाच्या कामाचा शुभारंभ शिवजयंती निमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांच्या उपस्थित श्रीफळ वाढवून करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी दिल्लीतील ‘रोबोटिक कुत्र्या’च्या वादावरून राज्य सरकारची तुलना ‘बनावट’ कामांशी केली.



आदित्य ठाकरे म्हणाले, दिल्लीतील एआय समिटमध्ये सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. जगभराचे लक्ष या समिटकडे आहे, पण तिथे पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही. कोणत्याही नेत्यांच्या फोटो तिथे लावले जात नाहीत, पण सरकारने नेत्यांची फोटो लावले, तिथे फक्त कृत्रिम बुद्धिमत्तेचे काम दाखवले जाते.

मुंबईतील विकासकामांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना आदित्य ठाकरे म्हणाले, “सुशोभीकरणाचा ९९ टक्के निधी केवळ सत्ताधारी लोकांशी संबंधित कंत्राटदारांकडे गेला आहे. मुंबईत एकही रस्ता पूर्ण झालेला नाही, पण अनेक ठिकाणी ‘डबल रंगरंगोटी’ करून पैसे लाटले जात आहेत. आमचे काम गलगोटियासारखे बनावट नाही. आम्ही जे करतो ते प्रत्यक्षात दिसते. असले ‘डुप्लिकेट’ काम फक्त हे ‘डुप्लिकेट’ सरकारच करू शकते,

Government’s Work as Fake as Galgotias University, Aditya Thackeray Alleges

महत्वाच्या बातम्या