Shambhuraj Desai ठाणे खाडी किनारा मार्गाच्या कामात अनियमितता नाही, शंभूराज देसाई यांनी केले स्पष्ट
ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या कामाच्या ढोबळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत कामाच्या संख्येत वाढ झाल्याने सविस्तर अंदाजपत्रकात वाढ झाली असून या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.











