अजात शत्रू, मुसद्दी राजकारणी, आणि कवी मनाचा नेता अशी ओळख असणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या जितक्या राजकारणाच्या आणि संसदेतल्या त्यांच्या भाषणाची जितकी चर्चा होते.. तितकीचचर्चा त्यांच्या प्रेमकहानीची देखील चर्चा होते. ज्या ज्या वेळी भारतीय राजकारण्यांच्या प्रेम कहाण्यांचा विषय येतो. तेंव्हा जगावेगळ्या वाजपेयींच्या 40 च्या दशकात फुलणाऱ्या या प्रेम कहानी ची आठवण येते !आणि मग असंख्य प्रश्न पडतात.. आज वाजपेयी यांची 99 वी जयंती त्यानिमित्ताने त्यांच्या या हळव्या प्रेम कहानी ची ही आठवण वाजपेयी यांच्यासारखा कवी मनाचा मात्र राजकारणाच्या पटलावर तितकाच कणखर असलेला या नेताच्या मनात नेमक कोण होतं? कसा सुरु झाला असेल त्यांच्या प्रेमाचा प्रवास?