आज पर्यंतचा सावित्री जिंदाल यांचा संपूर्ण प्रवास हा रोलर कॉस्टल राईड.. सारखा आहे. सावित्री यांचा जन्म 20 मार्च 1950 मध्ये आसाम मध्ये झाला. त्या काही काल हरियाणा इथं वास्तव्यास होत्या. त्यांचं शिक्षण पदवी पर्यंत झालं. आणि त्यानंतर ओ. पी जिंदाल यांच्या सोबत त्यांचं लग्न झालं आणि त्या गृहिणी म्हूणन जिंदाल यांच्या सोबत संसारात रमल्या. त्यांना ऐकून नऊ अपत्य झाली. मात्र 2005 ला हेलिकॉप्टर अपघातात त्यांचे पती ओम प्रकाश जिंदाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि वयाच्या 55 व्या वर्षी सावित्री जिंदालं यांच्या कडे सुमारे 14 अब्ज डॉलर ची उलाढाल असलेल्या व्यवसायाची सगळीसूत्र आली .. आणि त्या क्षणा पासून,सावित्रीयांचं सगळं आयुष्यचं पूर्णतः बदललं.