Guillain Barre Syndrome पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ व्याधीची लागण, २२ संशयित रुग्ण

Guillain Barre Syndrome पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ व्याधीची लागण, २२ संशयित रुग्ण

विशेष प्रतिनिधी

पुणे : कोरोना साथीच्या आठवणी ताज्या असताना गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुइलेन बॅरे सिंड्रोम या अतिशय दुर्मिळ अशा व्याधीची लागण झाल्याचे रुग्ण वाढत आहेत. 22 संशयित आढळले जुलाब, ताप आणि अशक्तपणासारख्या तक्रारी केल्या जात आहेत.

एका महिलेला या व्याधीनं ग्रासल्यानंतर डॉक्टरांच्या पथकानं तिच्यावर यशस्वीपणे उपचार केले पुणे महानगर पालिकेकडे अशा प्रकारचे २२ संशयित रुग्ण आढळल्याची माहिती देण्यात आली आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटलमध्ये या आजाराशी संबंधित लक्षणं आढळल्याची तक्रार असणारे रुग्ण दाखल झाल्यानंतर ही माहिती महानगर पालिकेला कळवण्यात आली आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय व पूना हॉस्पिटल या दोन रुग्णालयांमध्ये या व्याधीशी संबधित लक्षणं दिसून आल्याची तक्रार घेऊन रुग्ण दाखल झाले आहेत. हे रुग्ण प्रामुख्याने सिंहगड रोड परिसरातले आहेत.

गेल्या आठवड्याभरातच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल झालेल्या १६ रुग्णांनी ही लक्षणं जाणवत असल्याचं सांगितलं. त्यात सहा लहान मुलांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण धायरी, सिंहगड रोड आणि किरकटवाडी परिसरातले होते. या १६ पैकी ८ रुग्णांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. पूना हॉस्पिटलमध्ये तीन रुग्ण दाखल आहेत.

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार असून दर वर्षी १ लाख लोकांमध्ये एका व्यक्तीला होतो. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होत असले, तरी २० टक्के रुग्णांना सहा महिन्यांनंतरही हालचालींमध्ये अडचणी येतात.

पुणे पालिका आरोग्य अधिकारी डॉ. निना बोराडे यांनी सांगितले की गुलियन बेरी सिंड्रोम’ आजार पसरण्याबाबतीत पुणे महानगरपालिका सर्तक आहे. आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलावली असून यावर आढावा घेतला जाणार आहे. पुण्यातील तीन ते चार हॉस्पिटलमध्ये 22 संशयित रुग्ण आहे सहा पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आहेत. या सगळ्यांचे सॅम्पल्स एन आय व्ही कडे पाठवण्यात आले आहे.

हा आजार एका कोणत्यातरी वेगळ्या आजारासोबत लागून येतो. याआजाराला सेकंडरी आजार म्हटलं जातं. बारा ते 30 च्या दरम्यान च्या वयोगटातल्या लोकांना आजार होतो हा आजार धोकादायक नाही आणि घाबरून जाण्याचे कारण नाही . हा संसर्गजन्य आजार नाही, असे त्यांनी सांगितले.

22 suspected cases of very rare disease Guillain Barre Syndrome in Pune

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023