Mahakumbh Mela महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नानावर बंदी , चेंगराचेंगरीत सतरा भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व आखाड्यांचा निर्णय

Mahakumbh Mela महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नानावर बंदी , चेंगराचेंगरीत सतरा भाविकांचा मृत्यू झाल्यानंतर सर्व आखाड्यांचा निर्णय

विशेष प्रतिनिधी

प्रयागराज: महाकुंभ मेळ्यादरम्यान मौनी अमावस्येनिमित्त संगम तीरावर चेंगराचेंगरी होऊन सतरा भाविकांचा मृत्यू झाला. भाविकांचा जनसागर लोटला असून अमृत स्नानसाठी प्रचंड मोठी गर्दी जमली आहे. त्यामुळे महाकुंभ मेळ्यातील अमृत स्नानावर बंदी घालण्याचा निर्णय सर्व आखाड्यांनी घेतला आहे. Mahakumbh Mela

मौनी अमावस्येला अमृत स्नानासाठी प्रयागराजमध्ये देशातील कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. ही गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर परिसरात चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून सर्व आखाड्यांनी अमृत स्नानावर बंदी घातली आहे. महाकुंभमेळ्याच्या गर्दीत अनेक महिलांना आणि पुरुषांना गुदमरल्यासारखे वाटू लागले. यानंतर घटनास्थळी ढकलाढकली सुरू झाली. यामुळे बॅरिकेडिंग तुटून काही वेळातच चेंगराचेंगरीची घटना घडली आहे.
महाकुंभात देशाच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांचा ओघ सुरूच आहे.

आज मौनी अमावस्या आहे. आज नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी आहे. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी सुमारे 10 कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे. अशात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने अमृत स्नानचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. आखाड्यांनीही त्यांच्या मिरवणुका छावण्यांमध्ये परत बोलावल्या आहेत. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी यांनी ही माहिती दिली. सध्या प्रशासनाकडून गर्दीवर नियंत्रण मिळवलं जात आहे. जागोजागी पोलीस दल तैनात करण्यात आलं आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितलं की, लोकांच्या सुरक्षेसाठी आखाडे आज अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. मी लोकांना आवाहन करतो की, आजच्या ऐवजी वसंत पंचमीला अमृत स्नान करा. अमृतस्नानासाठी प्रत्येक भाविकाला मुख्य संगम घाटावर पोहोचायचं होतं, यातूनच ही चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामुळे भाविकांनी संगम घाटावर येण्याऐवजी जिथे पवित्र गंगा दिसेल तिथेच स्नान करावे. ही प्रशासनाची चूक नाही. कोट्यवधी लोकांची गर्दी नियंत्रित करणं, सोपी गोष्ट नाही.

AmrutSnan ban in Mahakumbh Mela, after seventeen devotees died in the stampede, the decision of all the Aakhadas

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023