Arvind Kejriwal : श्री 420 अरविंद केजरीवाल …हाउसिंग स्कीमच्या नावाखाली झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून उकळले लाखो रूपये

Arvind Kejriwal : श्री 420 अरविंद केजरीवाल …हाउसिंग स्कीमच्या नावाखाली झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून उकळले लाखो रूपये

Arvind Kejriwal

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: Arvind Kejriwal राज कपूर यांच्या ‘ श्री 420’ या चित्रपटात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना पक्क्या घराचे स्वप्न दाखवून एक टोळी कोट्यवधी रुपये उकळते. अगदी असाच प्रकार दिल्लीत आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांनी केल्याचा आरोप झाला आहे.Arvind Kejriwal

आम आदमी पक्षाचे सरकार दिल्लीमध्ये सत्तेत असताना हाउसिंग स्कीमच्या माध्यमातून त्यांनी झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून लाखो रूपये उकळले. त्यांना राहायाला पक्कं घर मिळेल असं खोटं आश्वासन दिलं. परंतु आपच्या नेत्यांनी या गरिबांना फसवलं असून त्यांचे पैसे लुबाडले” असा आरोप भाजपनेते परवेश वर्मा यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संस्थापक अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.



अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या वर्मा यांनी आप चा अजून एक घोटाळा जगासमोर आणला आहे. ते म्हणाले की आम आदमी पक्षाने सार्वजनिक व्यवस्था पूर्णपणे बिघडवली आहे. दिल्लीमध्ये राहणारे नागरिक विशेषतः झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची केजरीवालांनी दिशाभूल केली आहे. मला केजरीवालांना विचारायचं आहे की गरिबांची घरं उद्धवस्त करून स्वतः साठी शीशमहाल कोण बनवतं आहे ? असा प्रश्न वर्मा यांनी विचारला. केजरीवाल जर का आपलं वचन पूर्ण करू शकत नसतील तर त्यांनी निवडणूक लढवू नये असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. सदर पत्रकार परिषदेत झोपडपट्टींमध्ये राहणारे अनेक रहिवासी उपस्थित होते.

वर्मा यांनी माहिती कायद्यांतर्गत सगळे पुरावे सादर केले. दिल्ली सरकारने झोपडीत राहणाऱ्या लोकांकडून पैसे घेतले परंतु वचन दिल्याप्रमाणे फ्लॅट्स दिलेले नाही. आम आदमी पक्षाच्या आख्त्यारीत असलेल्या नगरपालिकाने झोपड्या हटवण्याचे काम केले परंतु योग्य नागरिकांना घरं दिली नाहीत असा आरोप वर्मा यांनी केला.

Shri 420 Arvind Kejriwal …extorted lakhs of rupees from slum dwellers in the name of housing scheme

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023