विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारच्या मतदारयादीतील “डुप्लिकेट मतदार” प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’ या गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात १५ मतदारसंघांमध्ये तब्बल ६७,८२६ मतदारांची नावे डुप्लिकेट स्वरूपात आढळल्याचा दावा केला. मात्र, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) यांनी या दाव्याला दिशाभूल करणारा आणि अर्धवट माहितीवर आधारित ठरवत फेटाळले. Bihar Election Commission
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘X’ या प्लॅटफॉर्मवर सविस्तर स्पष्टीकरण देत म्हटले की, ही यादी अद्याप विशेष सारांश पुनरावलोकन (Special Summary Revision – SIR) प्रक्रियेत आहे. सध्या प्रसिद्ध केलेल्या मतदारयाद्या या केवळ मसुदा आहेत, ज्यावर जनतेला, राजकीय पक्षांना आणि संबंधितांना हरकती व सूचना मांडता येतात. त्यामुळे या टप्प्यावर दिसणारी कोणतीही पुनरावृत्ती अंतिम चूक मानता येणार नाही.
६७,८२६ डुप्लिकेट मतदार असल्याच्या दाव्याबाबतही अधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. त्यांनी स्पष्ट केले की, अहवालातील आकडे हे केवळ नाव, नातेवाईकाचे नाव आणि वय या घटकांच्या ‘सब्जेक्टिव्ह मॅचिंग’वर आधारित आहेत. ग्रामीण बिहारमध्ये एकाच नावाचे, एकाच वडिलांच्या नावाचे आणि जवळपास सारख्याच वयाचे अनेक लोक असणे सामान्य बाब आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अशा परिस्थितीला केवळ शंका मानले आहे, पुरावा नव्हे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाकडे ERONET 2.0 ही प्रणाली आहे, जी ‘Demographically Similar Entries (DSEs)’ म्हणजेच एकसारखी नावे व तपशील असलेले प्रकरण ओळखते. मात्र ही नावे स्वयंचलितरीत्या वगळली जात नाहीत. त्याची चौकशी प्रत्यक्ष पातळीवर बूथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) आणि नोंदणी अधिकारी (ERO) करतात. यामुळे खरी मतदार नावे चुकीने बाद होणार नाहीत, याची काळजी घेतली जाते.
अहवालात ‘अंजली कुमारी’ (त्रिवेणीगंज) आणि ‘अंकित कुमार’ (लौकहा) अशी उदाहरणे देण्यात आली होती. त्याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ही प्रकरणे तांत्रिक चुका किंवा स्थलांतरामुळे झालेल्या अनेक नोंदी असू शकतात. “या दोन्ही प्रकरणांमध्ये दुरुस्तीकरिता फॉर्म ८ आधीच भरले गेले आहेत,” असे ट्विटद्वारे सांगण्यात आले.
डेटा जाणीवपूर्वक ‘लॉक’ करण्यात आल्याचा आरोपही मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नाकारला. त्यांनी स्पष्ट केले की, संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक असून प्रत्येक मतदार, पक्ष किंवा नागरिकाला हरकती व दुरुस्तीसाठी अर्ज करण्याचा अधिकार आहे.
Bihar Election Commission rejects claims of ‘Soros-funded journalist group’
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल