विशेष प्रतिनिधी
मुंबई : Palghar sadhu murder case पालघर साधू हत्याकांडात भारतीय जनता पार्टीने गंभीर आरोप केलेल्या काशिनाथ चौधरींना भाजपात पक्षप्रवेश दिला होता. यावर विरोधकांकडून तसेच हिंदुत्ववादी संघटनांकडून टीका होऊ लागल्यानंतर डहाणू येथील काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतला आहे.Palghar sadhu murder case
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र पाठवून काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याचं कळवले आहे. काशिनाथ चौधरी हे शरद पवार गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिंचले येथे झालेल्या साधू हत्याकांडात भाजपाने काशिनाथ चौधरी यांना प्रमुख आरोपी असल्याचे म्हटले होते.Palghar sadhu murder case
मात्र त्यानंतर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काशिनाथ चौधरी यांना अलीकडेच भाजपात प्रवेश देण्यात आला. भाजपा खासदार हेमंत सावरा आणि स्थानिक नेत्यांनी त्यांना पक्षात घेतले. मात्र यावरून सोशल मीडियावर भाजपाविरोधात विरोधकांनी टीका केली. भाजपाविरोधी राजकीय पक्षांसोबतच हिंदुत्ववादी संघटना, आरएसएस कार्यकर्ते यांनीही चौधरी यांच्या पक्षप्रवेशावर आक्षेप घेतला. त्यानंतर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांना पत्र दिले आहे. त्यात काशिनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात यावी अशा सूचना केल्या.
महाविकास आघाडी शासनाच्या काळात गाजलेले पालघर साधु हत्याकांड सगळ्यांनाच माहिती आहे. या घटनेवरून भाजपाने मविआ सरकारविरोधात आरोपांचं रान उठवले होते. लॉकडाऊन काळात पालघर जिल्ह्यात साधू चिनमयानंद आणि सुधाम महाराज यांच्यासह त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात ही घटना घडल्याने भाजपाने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारला घेरले हाेते.
BJP blocks entry of Kashinath Chaudhary, accused in Palghar sadhu murder case
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis गतिमान आणि प्रगतीशील कायदा-सुव्यवस्था उभी करणार! अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांची बैठक
- Russia : ”रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल पॉवर प्लांटवर हल्ला केला”
- PM Modi : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत-अमेरिका व्यापार संबंध अधिक मजबूत
- Manipur : मणिपूरमधील कॅम्पमध्ये सीआरपीएफ जवानाने केला गोळीबार अन् नंतर…



















