विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोणत्याही परिस्थितीत मुंबईत भाजपचा महापौर निवडून आला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रदेश भाजपच्या नेत्यांना दिल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीत विजयासाठी कानमंत्र दिला. Amit Shah
शहा यांनी आपल्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीत लालबागचा राजा, मंत्री आशीष शेलार यांच्या सार्वजनिक मंडळाचा गणपती व अंधेरीचा महाराजा यांचे दर्शन घेतले. या भेटीत शहा यांनी प्रदेश व मुंबईच्या निवडक नेत्यांशी आगामी निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीची चर्चा केली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा आदी नेते या बैठकीस उपस्थित होते.
राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर असून मुंबईसह राज्यात जेथे शक्य होईल, तेथे युतीत निवडणूक लढवावी, मात्र महापौरपद व सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष भाजपच असावा, या दृष्टीने जागावाटप व रणनीती निश्चित करा, अशा सूचना शहा यांनी प्रदेश व मुंबईच्या नेत्यांना दिल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहा यांची स्वतंत्र भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये काम करीत असताना येत असलेल्या अडचणी किंवा होत असलेली कोंडी, रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा पेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील जागावाटपाचे प्रश्न आदी मुद्द्यांवर चर्चा केल्याचे समजते.
मुंबई महापालिकेच्या गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीत भाजपची सत्ता थोडक्यात निसटली होती. त्यावेळी युतीत असलेल्या एकत्रित शिवसेनेला दुखवायला नको म्हणून सत्ता स्थापनेसाठी भाजपने प्रयत्नही केला नव्हता.
BJP wants a mayor in Mumbai under any circumstances! Amit Shah takes stock of the election
महत्वाच्या बातम्या
- किती माजलाय तो जरांग्या, भाषा मग्रुरीची : गुणरत्न सदावर्ते यांचा हल्लाबाेल
- मंत्र्याला काढण्याची घटनेतच तरतूद तर घटना दुरुस्ती कशासाठी, प्रकाश आंबेडकर यांचा सवाल
- न्यायदेवता अन्याय करणार नाही, मुंबईत जाणारच : मनाेज जरांगेंचा निर्धार
- एकेरी भाषा, आयाबहिणींवर अपशब्द खपवून घेणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मनाेज जरांगेंना इशारा