विशेष प्रतिनिधी
Kejriwal दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांच्यावरील नाराजीचा मोठा फटका पक्षाला बसणार आहे. बहुतांश एक्झिट पोल्सनी सुमारे २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
मागच्या तीन निवडणुकींत दिल्लीत आम आदमी पक्षाचा विजय झाला होता. त्याआधी दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपा आणि आम आदमी पक्षात जोरदार चुरस पाहायला मिळाली. काँग्रेसचा मात्र निवडणुकीवर फारसा प्रभाव दिसला नसल्याचे एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून सध्या तरी दिसत आहे. मात्र आपचा झालेला पराभव काँग्रेसने मते खाल्ल्यामुळे झाल्याचे दिसून येत आहे.
२०१३ साली ‘आप’ने दिल्लीत चांगली कामगिरी करत यश मिळवले होते. त्यानंतर २०१५ साली झालेल्या निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा जिंकत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. २०२० सालीही आम आदमी पक्षाचा मोठा विजय झाला होता. केंद्रात सत्ता असूनही दोन वेळा दिल्लीत पराभव सहन करावा लागल्यानंतर यावेळी भाजपाने सत्ता मिळविण्यासाठी कंबर कसली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता.
विविध एक्झिट पोल्सचे अंदाज
एक्झिट पोल्स भाजपा (अंदाजे) आप (अंदाजे) काँग्रेस (अंदाजे)
चाणक्य स्ट्रॅटेजी ३९-४४ २५-२८ २-३
पोल डायरी ४२-५० १८-२५ ०-२
एबीपी मॅट्रीझ ३५-४० ३२-३७ ०-१
पी मार्क ३९-४४ २१-३१ ०-१
पीपल पल्स ५१-६० १०-१८ ०-१
पीपल्स इनसाइट ४०-४४ २५-२८ ०-१
जेव्हीसी ३९-४५ २२-३२ ०-२
BJP’s power in Delhi after 27 years, Displeasure against Kejriwal has hit AAP
महत्वाच्या बातम्या
- अंजली दमानिया यांच्यावर धनंजय मुंडे दाखल करणार फौजदारी अब्रुनुकसानीचा खटला
- पंतप्रधान नरेंद्र मोदी कुंभमेळ्यात, दिल्लीत आज मतदान
- Anjali Damania : अंजली दमानिया यांनी वाचला धनंजय मुंडेंच्या भ्रष्टाचाराचा पाढा, कृषीमंत्री असताना दुपटीहून दराने खरेदी
- Supriya Sule : पीकविमा योजनेतील भ्रष्टाचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई, खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आश्वासन