विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: Sanjay Shirsat शिवसेनेत फूट पडल्याने आपल्याला यातना होत आहेत. दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात यासाठी प्रयत्न करेल असे वक्तव्यसामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले होते. मात्र यावर 24 तास उलटण्याच्या आताच आपण असे बोललो नाही असे म्हणत कानावर हात ठेवले आहेत.Sanjay Shirsat
शिरसाट म्हणाले, काल मी जे वक्तव्य केलं त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला आहे. शिवसेना फुटू नये या मताचे आम्ही होतो. मी प्रयत्न करतो असे समजण्याचा काहीच कारण नाही. मी कोणता विद्वान आहे त्यांना सांगायला ? मी काही वेगळे प्रयत्न करेल असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. भविष्यात जे घडेल त्याचा आनंदच आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना ते म्हणाले,
त्यांना सत्तेचा मोह होता, सत्तेच्या मोहापायी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेले. उद्धव ठाकरे यांनी राजा म्हणून राज्य करावे आणि आम्ही सेवक म्हणून कारभार केला असता. सत्तेसाठी शिंदे बाहेर पडले नव्हते.. त्यांना राग होता तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेल्याचा. येणारी मनपा निवडणूक झाल्यावर उद्धव ठाकरे यांना कळेल की खूप मोठी चूक झाली आहे.आता पुलाखालून पाणी फार वाहून गेले आहे. आता दोन्ही शिवसेना एक येणे शक्य नाहीं एकत्र आले तर हरकत नाही. मात्र आता हे एकत्र येणार नाही.
अमित शहा यांना अफजल खान यांची उपमा, हे अनबॅलेंस झाले आहेत. मी कितीही प्रयत्न केला तरी हे एकत्र येणार नाही असे सांगून शिरसाट म्हणाले, आता अशी अवस्था आहे की काँग्रेस जी सत्तेत होती त्यांचा साधा फोन देखील यांना नाही. यांना स्वतःचा म्हणणारे आता कोणताही पक्ष नाही. उद्धव ठाकरे यांचे कान भरण्यात आले होते. आम्ही ८ ते १० जण नाराज आहे. त्यांना जाऊ द्या. मात्र जेंव्हा उठाव झाला तेंव्हा कळाले की हे 40 जण होते.25 वर्षे युतीत सडले हे म्हणाले मात्र अडीच वर्ष ज्यांच्या सोबत काढले त्यांनी किती त्रास दिलं हे सांगत नाही.
त्यांच्याकडे एवढे रथी महारथी आहेत. त्यांच्याकडे विद्वानांची गँग आहे. ही उद्धव ठाकरे यांना सुधारू देणार नाही.
शिरसाट म्हणाले, मी गंगाधर गाडे यांनी घेऊन मातोश्रीवर गेलो होतो, भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न केला होता. ते चांगल्या प्रकारे यशस्वी देखील झाले आहे..
Both Shiv Sena together..Sanjay Shirsat put his hand on his ear, he did not say that
महत्वाच्या बातम्या