विशेष प्रतिनिधी
दिल्ली : दिल्ली दंगलीचे सूत्रधार उमर खालिद आणि शरजील इमाम हेच असल्याचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने नोंदविले आहे. Umar Khalid and Sharjeel Imam
2 सप्टेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने 2020 मधील दिल्ली दंगलीतील मोठ्या कटकारस्थान प्रकरणात आरोपी उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या जामिन अर्जाला नकार दिला. न्यायमूर्ती नवीन चावला आणि न्यायमूर्ती शालिंदर कौर यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालात असे नमूद केले की, या टप्प्यावर उपलब्ध पुराव्यांवरून दोघांनीही निदर्शनांच्या नियोजनात व चिथावणी देण्यात भूमिका बजावल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.
न्यायालयाने स्पष्ट केले की, या टप्प्यावर प्रकरणाच्या मूळ गुणदोषांवर चर्चा न करता फक्त जामिनावर निर्णय दिला जात आहे. इतर काही आरोपींना याआधी मिळालेल्या जामिनाशी समानता दाखवत खालिद आणि इमाम यांना जामिन मिळावा असा युक्तिवाद ग्राह्य धरता येणार नाही, कारण त्यांची भूमिका इतर आरोपींपेक्षा वेगळी असल्याचे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाच्या आदेशानुसार डिसेंबर 2019 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAB) पारित झाल्यानंतर सर्वात पहिले पाऊल उचलणारे उमर खालिद आणि शरजील इमाम होते. त्यांनी व्हॉट्सअॅप गट निर्माण करून मुस्लिम बहुल भागांमध्ये पत्रके वाटली व निदर्शने आणि चक्का जामचे आवाहन केले, ज्यात आवश्यक पुरवठा बंद करण्याचाही उल्लेख होता.
सरकारच्या बाजूने मांडणी करताना सॉलिसिटर जनरल यांनी असा युक्तिवाद केला की, इमाम आणि खालिद हे या कटकारस्थाना मागील सूत्रधार होते. त्यांनी केलेल्या भाषणांचा विचार एकत्रितपणे केल्यास ते केवळ राजकीय अभिव्यक्ती नव्हे तर चिथावणीखोर असल्याचे दिसते.
बचाव पक्षाने असा युक्तिवाद केला की, शरजील इमाम जानेवारी 2020 पासून कोठडीत असल्यामुळे दंगलींमध्ये त्यांचा सहभाग असू शकत नाही. उमर खालिद दंगलस्थळी उपस्थित नव्हते. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. आदेशात म्हटले आहे की, आरोपी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित होते की नाही याला महत्त्व नाही, कारण मुख्य भूमिका जसे की प्राथमिक नियोजन, गटांची निर्मिती, संकल्पना व चिथावणी हे सर्व दंगलीपूर्वीच पूर्ण झाले होते.
Delhi riot masterminds Umar Khalid and Sharjeel Imam, observed by the Delhi High Court
महत्वाच्या बातम्या
- शरद पवारांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये, राधाकृष्ण विखे पाटील यांचा टोला
- शरद पवार भेटीला पोचणार म्हटल्याबरोबर मनोज जरांगे ताठ; उर्मट भाषेत फडणवीसांच्या पाठोपाठ राज ठाकरेंवर निशाणा!!
- मनोज जरांगे प्रमाणिक, पण त्याचा वापर, रोहित पवारांकडून रसद, नितेश राणे यांचा आरोप
- स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? मनाेज जरांगे यांचा राज ठाकरेंना सवाल