डॉक्टरांच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश. हवाला, स्फोटके, भरती आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर

डॉक्टरांच्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश. हवाला, स्फोटके, भरती आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन समोर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या भीषण कार स्फोटाच्या तपासात देशभरात पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलचे धागेदोरे उलगडत आहेत. हा तपास केवळ एका स्फोटापुरता मर्यादित न राहता दिल्ली, फरीदाबाद, नूंह, लखनऊ आणि परदेशातील कनेक्शन्सपर्यंत पोहोचला आहे. तपास यंत्रणांनी एका आठवड्यापूर्वी फरीदाबादमधील डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली होती. तीच स्फोटके या कार स्फोटाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे केंद्रस्थान फरीदाबादमधील अल फालाह विद्यापीठ असल्याचे समोर आले आहे. Delhi Blast

10 नोव्हेंबरला झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक नागरिक जखमी झाले. तपासात हे स्पष्ट झाले की स्फोट करणारा व्यक्ती डॉ उमर उन नबी होता. तो फरीदाबाद येथील अल फालाह विद्यापीठाशी संबंधित वैद्यकीय व्यावसायिक होता. त्याचा डीएनए त्याच्या आईच्या डीएनएशी जुळवल्यावर त्याची ओळख निश्चित झाली. स्फोटापूर्वीच या विद्यापीठातील डॉ मुजम्मिल आणि डॉ शहीन नावाचे दोन डॉक्टर अटक झाले होते. त्यांच्या जवळून स्फोटके आणि शस्त्रे जप्त झाली होती. Delhi Blast

घटनास्थळी फॉरेन्सिक टीमने तीन 9 एमएम कारतूस शोधले. त्यापैकी दोन जिवंत आणि एक रिकामा होता. हे कारतूस केवळ सुरक्षा दलांना किंवा विशेष परवानगी असणाऱ्यांनाच वापरता येतात. आश्चर्य म्हणजे या परिसरातून एकाही प्रकारचे पिस्तूल किंवा शस्त्राचे अवशेष आढळले नाहीत. त्यामुळे हे कारतूस स्फोटात वापरले गेले की तपास दिशाभूल करण्यासाठी जाणीवपूर्वक ठेवले गेले, याचा शोध घेतला जात आहे.

तपासाचा केंद्रबिंदू अल फालाह विद्यापीठ ठरले. दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचने ओखला येथील विद्यापीठाच्या कार्यालयावर छापा टाकून दस्तऐवज जप्त केले. विद्यापीठावर बनावटपणा आणि फसवणूक यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि NAAC च्या निष्कर्षांवर आधारित दोन गुन्हे नोंदवले आहेत. दोन डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून पश्चिम बंगालमधील एक डॉक्टर चौकशीअंती सोडण्यात आला.



उमरने स्फोटाच्या आधी नूंहमधील हिदायत कॉलनी येथे सुमारे दहा दिवस घर घेतले होते. हे घर शुऐब नावाच्या इलेक्ट्रीशियनने उपलब्ध करून दिले. शुऐबची वहिनी या घराची मालक असून सध्या फरार आहे. घर बंद करण्यात आले असून परिसरात पोलिस पहारा ठेवण्यात आला आहे.नूंहमधील अल्ट्रासाऊंड सेंटरजवळून मिळालेल्या CCTV फुटेजमध्ये उमरची i20 कार अनेक तास थांबलेली दिसली. 30 ऑक्टोबरची दुसरी फुटेज कारला अल फालाह विद्यापीठात येताना आणि जाताना दाखवते.

तपासात महत्त्वाचा धागा हातात आला. जेमच्या हँडलरकडून हवाला मार्गे सुमारे 20 लाख रुपये उमर, मुजम्मिल आणि शहीन यांच्याकडे पाठवण्यात आले. यातील तीन लाख रुपये वापरून 26 क्विंटल NPK खत खरेदी करण्यात आले. कृषीमध्ये वापरले जाणारे हे खत स्फोटक तयार करण्यासाठी घटकद्रव्ये म्हणून उपयोगी पडते. पैसा कसा वापरायचा यावरून उमर आणि शहीन यांच्यात वाद झाल्याचे समोर आले आहे.

प्राथमिक तपासानंतर हा खटला राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला. तपासात उघड झाले की फरीदाबादमधून कार्यरत दहशतवादी मॉड्यूल अल फालाह विद्यापीठाचा आडोसा घेऊन देशभरात आत्मघाती हल्ल्यासाठी भरती करत होते.NIA च्या माहितीनुसार, आठ संशयित चार शहरांमध्ये एकाच वेळी स्फोट घडवून आणण्यासाठी तयार होते. प्रत्येक जोडीकडे IED असणार होते.

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने जम्मू आणि काश्मीरमधील चार डॉक्टरांची नोंदणी रद्द केली. त्यात डॉ मुजफ्फर अहमद, डॉ अदिल अहमद रदर, डॉ मुजम्मिल शकील आणि डॉ शहीन सईद यांचा समावेश आहे.

तपासात डॉ शहीन 2015 पासून जेमशी सक्रियपणे जोडली गेल्याचे समोर आले. 2010 पासून तिचा मानसिक कल बदलत गेला आणि एका परदेशस्थ भारतीय डॉक्टरकडून तिला कट्टरवादी साहित्य मिळत होते. 2022 मध्ये ती तुर्कीमध्ये ISI हँडलर अबू उकशा याला भेटली होती.

डॉ मुजम्मिलच्या डायरीत “ऑपरेशन हमदर्द”चा उल्लेख आढळला. यात तरुण मुलींच्या भरतीचे उद्दिष्ट होते. या जाळ्यात 25 ते 30 जण सामील असल्याचा अंदाज आहे. उमरने घरातच स्फोटकांची प्रयोगशाळा तयार केली होती. त्याला परदेशातून टेलिग्रामवरून बॉम्ब तयार करण्याचे व्हिडिओ आणि मॅन्युअल मिळत होते.

Doctor’s terror module exposed. Hawala, explosives, recruitment and international connections exposed : Delhi Blast

महत्वाच्या बातम्या

YOU MIGHT LIKE

RELATED POSTS

LATEST POSTS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023

Share

MENU

LATEST VIDEOS

LOKSABHA आणि RAJYASABHA खासदारांच्या

December 20, 2023

विरोधी बाकं रिकामी असतानाच मोदी सरकारनं पास केली ३

December 21, 2023

INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?

December 21, 2023